घाटकोपर- क्रांती क्रीडा महोत्सव घाटकोपर कबड्डी स्पर्धाचा काल उद्घाटन झाले. मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धाच आयोजन करण्यात आले आहे. काल महिला गटाचे २, व्दितीय श्रेणीचे ३, प्रथम श्रेणीचे ३ सामने खेळवण्यात आले.
महिला गटात संजीवनी क्रीडा मंडल भांडुप विरुद्ध सत्यम सेवा मंडळ कांजूरमार्ग यांच्यात झाला. सत्यम सेवा संघाने ४१-२९ असा विजय मिळवत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. पण नंतर दुसऱ्याफेरीत संघर्ष कडून ३२-२३ असा पराभवाला सामोरे जावे लागले. संघर्ष कडून सन्हेल पेडमकर व पुजा जाधव चांगल्या खेळल्या.
पुरुष द्वितीय श्रेणीमध्ये यंग मराठा स्पोर्ट्स क्लबवर शरद आचार्य स्मृती प्रतिष्ठानने २०-१५ विजय मिळवला. नरे स्टारने २१-१७ राम बाण क्रीडा मंडळावर विजय मिळवत दुसऱ्याफेरीत प्रवेश मिळवला. दुसऱ्या फेरीत यंग विजय स्पोर्टसने २५-०९ ने शरद आचार्य स्मृती प्रतिष्ठानला नमवले.
पुरुष प्रथम श्रेणी मध्ये सागर क्रीडा मंडळाने ३१-२३ ने मनोरंजन क्रीडा मंडळ संघाचा पराभव केला. सागर मंडळ कडून नितीन म्हात्रेने उत्कृष्ट खेळ केला. मात्र दुसऱ्या फेरीत स्फूर्ती क्रीडा मंडळाने सागर मंडळाचा ३५-१८ असा सहज पराभव केला. शिवशंकर निसरद प्रतिष्ठानने गुरू कृपा मंडळावर ३२-१० अशी मात देत दुसरी फेरी गाठली.





