पुणे, 10 ऑगस्ट 2024: क्रीडा प्रबोधिनीने कमालीचे सातत्य राखताना हॉकी महाराष्ट्र आयोजित सिनियर आणि ज्युनियर डिव्हिजन हॉकी पुणे लीग 2024-25 मध्ये दोन्ही गटांची अंतिम फेरी गाठली.
मेजर ध्यानचंद स्टेडियम, नेहरूनगर-पिंपरी येथे झालेल्या सीनियर डिव्हिजनच्या उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यात शनिवारी जीएसटी आणि कस्टम, पुणे संघाने मध्य रेल्वे, पुणेवर 4-2 असा विजय नोंदवला. तालिब शाहने (12वा पीसी., 42वा – पीएस, 56वा.) तीन गोल करताना विजयात मोलाचा वाटा उचलला. विजयी संघाकडून अलेक्झांडर मोसेसने (17वा) एक गोल केला. मध्य रेल्वेकडून पुण्याचा विशाल पिल्ले (32वे – पीएस) आणि स्टीफन स्वामीने (40वे) प्रत्येकी एका गोलाची भर घातली.
उपांत्य फेरीच्या दुसर्या लढतीत क्रीडा प्रबोधिनी ‘अ’ संघाने फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एफसीआय), पुणे संघावर 4-1 अशी मात केली. सचिन कोळेकर (3रा), रोहन पाटील (21वे), धैर्यशील जाधव (38वे- पीसी) आणि सचिन राजगडेने (60वे) क्रीडा प्रबोधिनीच्या विजयाला हातभार लावला. एफसीआय, पुणेकडून एकमेव गोल अजय नायडूने (18वे) केला.
ज्युनियर गटाची अंतिम लढत फ्रेंड्स युनियन क्लब विरुद्ध क्रीडा प्रबोधिनी ‘ब’ अशी होईल.
पहिल्या उपांत्य फेरीत फ्रेंड्स युनियन क्लबने हॉकी लव्हर्स स्पोर्ट्स क्लबचा 3-2 असा पराभव केला. कुणाल (7वा – पीसी), शुभम ठाकूर (12वे पीएस) आणि यश ठाकूरने (32वे) फ्रेंड्स युनियन क्लबच्या विजयात पुढाकार घेतला. स्वप्नील गरसुंदने (4व्या) यांनी हॉकी लव्हर्स स्पोर्ट्स क्लबला सुरुवातीलाच आघाडी मिळवून दिली. त्यानंतर1-3 असे पिछाडीवर असताना हितेश कल्याणाने (53वे – पीसी) गोल करताना सामन्यात रंगत आणली.
त्यानंतर क्रीडा प्रबोधिनी ‘ब’ संघाने पूना हॉकी अकॅडमीचा 5-0 असा धुव्वा उडवत दिमाखात फायनल प्रवेश केला. कार्तिक पटारे (2रा – पीएस, 29वा, 33वा, 58वा) त्यांच्या विजयाचा शिल्पकार ठरला. सूरज शुक्लाने (33वा) एक गोल केला.
रविवारी, अंतिम फेरीपूर्वी दोन्ही डिव्हिजनच्या तिसर्या क्रमांकाच्या लढती होतील.
निकाल –
सीनियर डिव्हिजन (उपांत्य फेरी)
उपांत्य फेरी 1: जीएसटी आणि कस्टम्स, पुणे: 4 (तालीब शाह 12वा पीसी, 42वा – पीएस, 56वा; अलेक्झांडर मोसेस 17वा) विजयी वि. मध्य रेल्वे, पुणे: 2 (विशाल पिल्ले 32वा – पीएस; स्टीफन स्वामी 40वा). हाफटाईम: 2-0
उपांत्य फेरी 2: क्रीडा प्रबोधिनी ‘ब’: 4 (सचिन कोळेकर 3रा; रोहन पाटील 21वा; धैर्यशील जाधव 38वा- पीसी; सचिन राजगडे 60वा) विजयी वि. फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एफसीआय), पुणे: 1 (अजय नायडू 18वा). कढ: 2-0
ज्युनियर विभाग (उपांत्य फेरी)
उपांत्य फेरी 1: फ्रेंड्स युनियन क्लब: 3 (कुणाल 7वा – पीसी; शुभम ठाकूर 12वा पीएस; यश ठाकूर 32वा) विजयी वि. हॉकी लव्हर्स स्पोर्ट्स क्लब: 2 (स्वप्नील गरसुंद 4वा; हितेश कल्याणा 53वा – पीसी). हाफटाईम: 2-1
उपांत्य फेरी 1: क्रीडा प्रबोधिनी ‘ब’: 5 (कार्तिक पटारे 2रा – पीएस, 29वा, 33वा, 58वा; सूरज शुक्ला 33वा) विजयी वि. पूना हॉकी अकादमी: 0. हाफटाईम: 2-0.