चेन्नई सुपर किंग्सचा संघ सध्या आयपीएल २०२१ हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी दुबईमध्ये आहे. याचदरम्यान त्यांच्या संघातील अष्टपैलू खेळाडू कृष्णप्पा गॉथमने आनंदाची बातमी दिली आहे. तो पुढीलवर्षी जानेवारीमध्ये बाबा होणार आहे. याबद्दल त्याने सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिली आहे.
आयपीएलमध्ये चेन्नई व्यतिरिक्त राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्सकडून खेळलेल्या गॉथमने त्याच्या गरोदर पत्नीबरोबरचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये त्याची पत्नी अर्चना सुंदर बेबी बमसह दिसून येत आहे. तसेच या फोटोंमध्ये दोघेही खूप खुश दिसत आहेत.
गॉथमने या फोटोंच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की ‘आम्ही एक छोटा चमत्कार घडवत आहोत. आमचे मन आनंदाने भरले आहे. आम्ही जानेवारी २०२२ मध्ये येणाऱ्या या छोट्या चमत्काराची वाट पाहात आहोत.’ गॉथमने अर्चनासह डिसेंबर २०१९ मध्ये लग्नगाठ बांधली होती.
We are brewing a little miracle.!
Our hearts are filled with gratitude and joy as we eagerly await the arrival of our little wonder in January 2022. #newbeginnings #gratitude #blessed #whentwobecomethree pic.twitter.com/xGsnb27mvU— Krishnappa Gowtham (@gowthamyadav88) September 12, 2021
गॉथम आत्तापर्यंत २४ आयपीएल सामने खेळला आहे. त्याने या २४ सामन्यांमध्ये १३ विकेट्स घेतल्या आहेत. तर १८६ धावा केल्या आहेत. त्याला चेन्नईने २०२१ आयपीएल हंगामासाठी ९.२५ कोटी रुपयांची किंमत मोजत संघात घेतले आहे. त्याला खरेदी केले, तेव्हा तो आयपीएलमधील सर्वात महागडा अनकॅप खेळाडू (आंतरराष्ट्रीय सामना न खेळलेला खेळाडू) ठरला होता. पण, त्याला अजूनतरी चेन्नईकडून एकाही सामन्यात अंतिम ११ जणांच्या संघात संधी मिळालेली नाही.
चेन्नईपूर्वी तो २०१८ आणि २०१९ च्या हंगामात राजस्थान रॉयल्सकडून खेळला. तर, २०२० चा आयपीएल हंगाम तो पंजाब किंग्सकडून खेळला.
गॉथमने नुकतेच जुलै महिन्यात श्रीलंका दौऱ्यादरम्यान भारतीय संघात पदार्पण केले होते. मात्र, त्याला दौऱ्याच्या अखेरीस कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आल्यामुळे क्वारंटाईन व्हावे लागले होते. त्याने श्रीलंका दौऱ्यात १ वनडे सामना खेळला. यात त्याने १ विकेट घेतली.
महत्त्वाच्या बातम्या –
अश्विनची निवड न होणे ते जार्वोची घुसखोरी, भारताच्या इंग्लंड दौऱ्यात चर्चेत राहिले ‘हे’ ४ मुद्दे
श्रीलंकेविरुद्ध ६९ धावांची खेळी केल्यानंतर दीपक चाहरला धोनीने केला होता ‘हा’ मेसेज
तब्बल १८ वर्षाच्या प्रदीर्घ काळानंतर न्यूझीलंड खेळणार पाकिस्तानात