कोलकता। भारत विरुद्ध विंडीज संघात आज (1 नोव्हेंबर) पहिला टी20 सामना इडन गार्डनवर सुरु आहे. या सामन्यातून आंतरराष्ट्रीय टी20मध्ये भारताकडून कृणाल पंड्या आणि खलील अहमदने पदार्पण केले आहे.
कृणालचा हा आंतराष्ट्रीय क्रिकटमधील पहिलाच सामना आहे. तसेच कृणालचे आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये पदार्पण झाल्याने भारतीय संघाबाबत एक खास योगायोग जळून आला आहे.
कृणालचा लहान भाऊ हार्दीक पंड्याने भारताकडून आत्तापर्यंत 35 टी20 सामने खेळला आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात भारताचे प्रतिनिधित्व करणारी हार्दिक-कृणालची दुसरीच भावांची जोडी ठरली आहे.
याआधी इरफान आणि यूसुफ पठाण या भावांच्या जोडीने आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. विषेश म्हणजे पठाण आणि पंड्या बंधू हे बडोदाकडून देशांतर्गत क्रिकेट खेळले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या:
–‘हिटमॅन’ रोहित शर्माला ‘युनिवर्स बॉस’ ख्रिस गेलला मागे टाकण्याची संधी
–हा एकमेव विक्रम ‘रनमशिन’ विराट कोहलीला अशक्य…
–…तर रोहित शर्मा बनणार धोनी, रैनानंतरचा असा पराक्रम करणारा तिसराच कर्णधार
–२०१९च्या आयपीएल आधी विरेंद्र सेहवागने घेतला मोठा निर्णय; ट्विटरवरुन दिली माहिती
–भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार: भाग १३- तामिळनाडूचा वन मॅच वंडर





