भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू कृणाल पंड्या याने सोशल मीडियावरून नुकतीच एक गोड बातमी दिली. आपण पिता झाल्याचे त्याने एका ट्विटद्वारे सार्वजनिक केले. त्याची पत्नी पंखुडी हिने एका गोंडस मुलाला जन्म दिला. त्या मुलाचे नामकरण कवीर असे करण्यात आले आहे. कवीर या शब्दाचा अर्थ हिंदीमध्ये सूर्य असा होतो.
Kavir Krunal Pandya ???????????????? pic.twitter.com/uitt6bw1Uo
— Krunal Pandya (@krunalpandya24) July 24, 2022
भारतीय क्रिकेट संघाचा सदस्य असलेल्य कृणालने रविवारी (२४ जुलै) दुपारी ही आनंदाची बातमी सर्वांना सांगितली. त्याने ट्विट करत ‘कवीर कृणाल पंड्या’ अशा कॅप्शनसह स्वतःचे व पत्नी पंखुडीचे छायाचित्र नवजात मुलासह पोस्ट केले. त्यानंतर अनेकांनी त्याचे अभिनंदन केले आहे. कृणालने २०१७ मध्ये पंखुडी शर्मा हिच्याशी लग्नगाठ बांधलेली. त्यानंतर आता पाच वर्षांनी त्यांच्या कुटुंबात नव्या सदस्याचे आगमन झाले आहे.
कृणाल याने आतापर्यंत भारतीय क्रिकेट संघासाठी ५ वनडे व १९ टी२० सामने खेळले आहेत. ३१ वर्षीय कृणाल आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्ससाठी खेळताना प्रसिद्धीझोतात आला होता. त्यानंतर त्याला भारतीय संघात जागा मिळाली. यावर्षीच्या आयपीएलमध्ये तो लखनऊ सुपरजायंट्स संघासाठी खेळला होता. नुकताच त्याने काउंटी क्लब वार्विकशायरशीही करार केलेला आहे. तो त्यांच्यासाठी वनडे स्पर्धा रॉयल लंडन कपमध्ये सहभागी होईल.
कृणालप्रमाणे त्याचा लहान भाऊ हार्दिक हा देखील भारतीय संघासाठी खेळतो. हार्दिकने नुकतेच भारतीय संघाचे नेतृत्व केले होते. आपल्या मोठ्या भावाला पुत्ररत्न प्राप्त झाल्यानंतर हार्दिकनेही इंस्टाग्राम स्टोरीद्वारे आपला भाऊ व वहिनीचे अभिनंदन केले. हार्दिक सध्या ग्रीस येथे सुट्ट्यांचा आनंद घेतोय. हार्दिक व त्याची पत्नी नताशा यांना देखील अगस्त नावाचा एक पुत्र आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
WIvsIND: दुुसऱ्या वनडेत कसे असेल हवामान, तर खेळपट्टीवर कोणाचे पारडे ठरणार जड; वाचा सविस्तर
भारताचा कर्णधार रोहित शर्मा कुटुंबासोबत मग्न, पत्नी रितीकासोबतचे फोटो केले शेअर






