इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२२चा हंगामाचा विजेता गुजरात टायटन्स ठरला. त्यांनी यावर्षीच आयपीएलमध्ये पदार्पण केले आहे. पहिल्या हंगामातच विजेतेपद जिंकण्याचा इतिहास निर्माण केल्याने संघावर चारही बाजूंनी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्यातच त्यांचा कर्णधार हार्दिक पंड्याच्या या यशाने सगळेच मंत्रमुग्ध झाले आहेत.
हार्दिकच्या (Hardik Pandya) या विशेष कामगिरीचे त्याचा भाऊ कृणाल पंड्या याने सोशल मिडीयावर पोस्ट करत आपला आनंद व्यक्त केला आहे. “भावा, तू आतापर्यंत जी कठोर मेहनत घेत सराव केलास त्याचेच हे फळ आहे आणि त्यासाठी तू पात्र आहेस”, असे कृणालने त्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
“लोकांनी तूला संपल्यालच जमा केले होते, पण तू इतिहास निर्माण करत राहिला. जेव्हा ती लाखो लोक, चाहते स्टेडियममध्ये तुझ्या नावाची घोषणा करत होते, तेव्हा मी पण तेथे उपस्थित राहायला पाहिजे होतो”, अशा शब्दांत कृणालने हार्दिकचे कौतुक केले आहे.
My bro 🤗 Only you know the amount of hard work that’s gone behind this success of yours – early mornings, countless hours of training, discipline and mental strength. And to see you lift the trophy is the fruits of your hard work ❤️ You deserve it all and so much more 😘😘 pic.twitter.com/qpLrxmjkZz
— Krunal Pandya (@krunalpandya24) May 31, 2022
रविवारी (२९ मे) नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद येथे झालेल्या पंधराव्या आयपीएल हंगामाच्या अंतिम सामन्यात गुजरातने राजस्थान रॉयल्स संघाचा ७ विकेट्सने पराभव केला. या सामन्यात हार्दिकने अष्टपैलू कामगिरी केली. राजस्थान संघाचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी केली.
त्यावेळी हार्दिकने ४ षटके टाकत ४.२५ इकॉनॉमी रेटने १७ धावा देत ३ विकेट्स घेतल्या. त्याने या सामन्यात सॅमसन, जोस बटलर आणि शिमरन हेटमायर या प्रमुख तीन फलंदाजांना बाद करत राजस्थानाचा मार्ग अवघड केला. राजस्थानने २० षटकात ९ विकेट्स गमावत १३० धावा केल्या.
या लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरात संघाने सलामीवीर वृद्धिमान साहाची विकेट लवकरच गमावली. नंतर हार्दिकने शुबमन गिलच्या सोबतीने धावफलक हलता ठेवला. त्याने ३० चेंडूत ३४ धावा केल्या. आयपीएल २०१५मध्ये पदार्पण करण्यापासून ते मागील हंगामात मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱ्या हार्दिकला गुजरात संघाने १५ कोटींमध्ये विकत घेतले होते. त्याने आतापर्यंत पाच आयपीएलचे अंतिम सामने खेळले असून या पाचही सामन्यांमध्ये त्याने संघाला विजय मिळवून दिला आहे.
या आयपीएल हंगामात हार्दिक सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर राहिला. त्याने १५ सामन्यांत खेळताना ४४.२७च्या सरासरीने ४८७ धावा केल्या आहेत. यात त्याने चार अर्धशतकेही केली आहेत. त्याचबरोबर आठ विकेट्सही घेतल्या आहेत.
गोलंदाजीत परत येत त्याने फलंदाजीतही चांगली कामगिरी केल्याने त्याचे भारतीय संघात पुनरागमन झाले आहे. त्याची जून महिन्यात होणाऱ्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका या पाच टी२० सामन्यांच्या मालिकेसाठी संघात निवड झाली आहे. यातील पहिला टी २० सामना ९ जूनला दिल्ली येेथे खेळला जाणार आहे.
महा स्पोर्ट्चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
तेलही गेलं अन् तूपही गेलं! अंतिम सामना गमावताच अश्विनच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद
क्रिकेटर्स मॅचवेळी काय खातात माहित आहे का? घ्या जाणून