भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. पण हा दौरा सुरु होण्याआधीच भारताचे वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि वॉशिंग्टन सुंदर दुखापतग्रस्त झाल्याने मर्यादित षटकांच्या मालिकेतून बाहेर पडले आहेत.
त्यामुळे आज बीसीसीआयने त्यांचे बदली खेळाडू म्हणून अष्टपैलू कृणाल पंड्या आणि मध्यमगती गोलंदाज दिपक चाहर यांची ३ जुलैपासुन सुरु होणाऱ्या टी२० मालिकेसाठी निवड करण्यात आली आहे.
याबरोबरच फिरकी गोलंदाज अक्षर पटेलची वॉशिंग्टन सुंदरचा बदली खेळाडू म्हणून १२ जुलैपासुन सुरु होणाऱ्या इंग्लंड विरुद्धच्या वनडे मालिकेसाठी निवड करण्यात आली आहे.
या निवडींबद्दल बीसीसीआयचे कार्यकारी सचिव अमिताभ चौधरी यांनी माहिती दिली.
NEWS: @krunalpandya24 named as a replacement for injured Washington Sundar in India’s T20I side & @akshar2026 in the ODI side.
Deepak Chahar named as a replacement for Jasprit Bumrah in T20I side.
More details here – https://t.co/HGq0BkZslB #ENGvIND pic.twitter.com/SeKMRvqWaE
— BCCI (@BCCI) July 1, 2018
सुंदरला सरावादरम्यान उजव्या पायाच्या घोट्याला दुखापत झाली आहे. त्यामुळे तो टी20 तसेच वनडे अशा दोन्ही मालिकेतून बाहेर पडला आहे. तसेच 27 जूनला आयर्लंडविरुद्ध झालेल्या पहिल्या टी20 सामन्यादरम्यान बुमराहचा डावा आंगठा फ्रॅक्चर झाल्याने तो टी20 मालिकेतून बाहेर पडला आहे.
त्यांच्या ऐवजी निवड झालेले कृणाल आणि चहर हे दोघेही सध्या इंग्लंड दौऱ्यावर असणाऱ्या भारत अ संघाकडून वनडेमध्ये खेळत आहेत. पण आता त्यांना वरीष्ठ संघाकडून खेळण्यासाठी बोलवण्यात आले आहे.
तसेच या दोघांचीही यावर्षीच्या आयपीलमध्येही चांगली कामगिरी झाली होती. त्यामुळे त्यांना भारतीय संघाकडून खेळण्याची संधी मिळाली आहे.
भारतीय संघ 3 जुलैपासुन सुरु होणाऱ्या इंग्लंड दौऱ्यात 3 टी20, 3 वनडे आणि 5 कसोटी सामने खेळणार आहे.
विशेष म्हणजे कृणालचा भाऊ हार्दिक पंड्याही भारतीय संघात असल्याने भारताकडून खेळणारी ही तिसरीच भावांची जोडी ठरणार आहे. या आधी भारताकडून मोहिंदर अमरनाथ-सुरिंदर अमरनाथ आणि युसुफ पठाण-इरफान पठाण या भावांच्या जोड्या खेळल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या:
–टॉप 5: आयसीसी विश्वचषकात सर्वाधिक विकेट घेणारे यष्टीरक्षक






