देशांतर्गत क्रिकेटमधील वनडे क्रिकेटची सर्वात मोठी स्पर्धा विजय हजारे ट्रॉफी सध्या सुरू आहे. रणजी ट्रॉफी रद्द झाल्याने या सध्याला अधिक महत्त्व प्राप्त झालेले दिसून येते. याच स्पर्धेत भारताचा अष्टपैलू कृणाल पंड्या हा चांगल्या फॉर्ममध्ये दिसत आहे. त्रिपुरा विरुद्ध नाबाद शतक ठोकल्यानंतर मात्र, तो भावूक झाला.
कृणालने ठोकले शतक
विजय हजारे ट्रॉफीतील एलिट ए गटातील सामने सुरत येथे खेळले जात आहेत. सोमवारी (२२ फेब्रुवारी) बडोदा व त्रिपुरा यांच्यात झालेल्या सामन्यात बडोदा संघाने ३०२ धावांचा पाठलाग करत विजय मिळवला. बडोद्याचा कर्णधार कृणाल पंड्याने पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला येत १२७ धावांची नाबाद खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. हे त्याच्या लिस्ट ए कारकीर्दीतील पहिलेच शतक आहे. कृणालने स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात देखील ७१ धावांची खेळी केली होती.
वडिलांची आली आठवण
त्रिपुरा विरुद्धच्या शतकानंतर कृणालने आपल्या दिवंगत वडिलांची आठवण काढताना एका पाठोपाठ तीन ट्विट केले. त्याने लिहिले, “मी शतक ठोकण्याची ही पहिली वेळ होती आणि हा सामना पाहण्यासाठी वडील माझ्याबरोबर उपस्थित नव्हते. ते आता या जगात नाहीत, हा विचार करून मी भावूक होतो. जर ते माझा खेळ पाहत असते तर, ते माझ्या प्रत्येक धावेवर खूष होत म्हणाले असते, कृणाल, शाब्बास रमतो रेहजे (टिकून राहा).”
कृणालने पुढच्या ट्विटमध्ये लिहिले, “योगायोगाने माझी आई पहिल्यांदा माझा सामना पहायला आली आणि मी शतक ठोकले. शतक झळकावून मी भावनाप्रधान झालो. ही खेळी मी वडिलांना अर्पण करतो. मला माहित आहे की त्यांच्या चेहर्यावर नेहमी हास्य होते. मी नेहमी त्यांचे आभार मानतो, कारण त्यांनी मला माझी स्वप्ने पूर्ण करण्याची संधी दिली. पापा आय लव्ह यू.”
कृणालने आपल्या पुढच्या ट्विटमध्ये लिहिले, “गेल्या महिन्यात मी सय्यद मुश्ताक अली टी२० स्पर्धेत ७६ धावा केल्या होत्या, तेव्हा मी त्यांच्याशी बोललो होतो. तेव्हा ते म्हणाले होते की, तुझी वेळ आता सुरू झाली आहे बेटा, हे माझ्या वडिलांचे शेवटचे शब्द होते. त्यावेळी वडिलांच्या तोंडून माझी स्तुती ऐकून मला फार आनंद झाला होता. मात्र, आज त्याची दूरदृष्टी पाहून मला आश्चर्य वाटले.”
“MY SON, YOUR TIME HAS JUST STARTED,” these were the last words of my Dad when we discussed cricket after I scored 76 in a SMAT game last month. Then, I was touched by his appreciation but now I’m astonished by his vision for me. pic.twitter.com/9NPsv7rJie
— Krunal Pandya (@krunalpandya24) February 23, 2021
Coincidentally, my Mom was here to watch the game for the first time and I scored a 100. I got emotional after the 100 & dedicated this innings to my Dad who I know had a grin on his face when I thanked him for every moment he has given me to fulfil my dreams. Papa, I LOVE YOU ❤️
— Krunal Pandya (@krunalpandya24) February 23, 2021
मागील महिन्यात झाले कृणालच्या वडिलांचे निधन
गेल्या महिन्यात हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने कृणालचे वडिल हिमांशी यांचा मृत्यू झाला. त्यावेळी तो सय्यद मुश्ताक अली टी२० स्पर्धा खेळत होता. वडिलांच्या मृत्यूची माहिती मिळताच कृणाल स्पर्धा सोडून घरी परतलेला. हार्दिक व कृणाल यांचे वडिलांशी खूप खास नाते होते. सोशल मीडियावर दोघेही नेहमीच आपल्या वडिलांसोबत घालवलेल्या गोड क्षणांची छायाचित्रे शेअर करतात.
महत्वाच्या बातम्या:
माजी भारतीय दिग्गज बेदी यांची प्रकृती चिंताजनक, करण्यात आली बायपास सर्जरी
युवा खेळाडूंसाठी सुवर्णसंधी! मास्टर ब्लास्टर देणार फलंदाजीचं मोफत प्रशिक्षण, पाहा कसं ते