लखनऊ सुपर जायंट्सचा अष्टपैलू खेळाडू क्रुणाल पांड्यानं आयपीएल 2024 चा 1000 वा षटकार ठोकला आहे. त्यानं बुधवारी सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात ही कामगिरी केली. हा या हंगामातील 57 वा सामना आहे.
क्रुणालनं हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर 21 चेंडूंत 2 षटकारांच्या मदतीनं 24 धावांची खेळी केली. तो 12व्या षटकात धावबाद झाला. क्रुणालनं जयदेव उनाडकटच्या आठव्या षटकातील चौथ्या चेंडूवर लाँग ऑनच्या दिशेने षटकार ठोकला. त्यानंतर त्यानं पाचव्या चेंडूवर पुन्हा हवेत शॉट खेळला, जो चालू हंगामातील 1000 वा षटकार ठरला.
1⃣0⃣0⃣0⃣ SIXES in #TATAIPL 2024 💥
Krunal Pandya gets going for Lucknow Super Giants 💪
Watch the match LIVE on @JioCinema and @StarSportsIndia 💻📱#SRHvLSG pic.twitter.com/OcHvFJSXmq
— IndianPremierLeague (@IPL) May 8, 2024
तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, आयपीएलच्या इतिहासातील हा केवळ तिसरा हंगाम आहे, जेव्हा खेळाडूंनी 1000 किंवा त्याहून अधिक षटकार मारले. याशिवाय आयपीएलमध्ये पहिल्यांदाच 70 पेक्षा कमी सामन्यांमध्ये आणि 15000 पेक्षा कमी चेंडूंमध्ये 1000 षटकारांचा आकडा गाठला गेला आहे.
आयपीएल 2022 मध्ये 74 सामने आणि 16269 चेंडूंमध्ये 1000 षटकार मारले गेले होते. तर आयपीएल 2023 मध्ये 74 सामने आणि 15390 चेंडूंमध्ये इतके षटकार लगावण्यात आले होते. आयपीएलच्या चालू हंगामात सर्वाधिक षटकार ठोकणारा खेळाडू केकेआरचा सुनील नारायण आहे. त्यानं आतापर्यंत 32 षटकार मारले आहेत.
आयपीएलच्या एका हंगामात 1000 षटकार
आयपीएल 2024 – 13079 चेंडू
आयपीएल 2023 – 15390 चेंडू
आयपीएल 2022 – 16269 चेंडू
सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या लखनऊ सुपर जायंट्सची सुरुवात चांगली झाली नाही. सलामीवीर क्विंटन डी कॉक 2 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. तो तिसऱ्याच षटकात भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीत नितीश रेड्डीच्या हाती झेलबाद झाला. मार्क स्टॉयनिसही (2) आज काही कमाल करू शकला नाही.
यानंतर कर्णधार केएल राहुलनं क्रुणाल पांड्यासोबत तिसऱ्या विकेटसाठी 36 धावांची भागीदारी केली. राहुलनं 33 चेंडूंचा सामना करत 29 धावा केल्या. त्यानं एक चौकार आणि एक षटकार मारला. राहुलची 10व्या षटकात कर्णधार पॅट कमिन्सनं विकेट घेतली. आयुष बदोनी 55 आणि निकोलस पूरन 48 धावांवर नाबाद राहिले. लखनऊनं 20 षटकांत 4 गडी गमावून 165 धावा केल्या.
महत्त्वाच्या बातम्या –