आयपीएल २०२१ चा दुसरा भाग सुरू झाला आहे आणि सर्व संघ त्यांचे सर्वोत्तम देण्यासाठी आणि त्यांच्या चाहत्यांना यूएईच्या भूमीवर चषक जिंकून देण्यासाठी आतुर झाले आहेत. दरम्यान, मुंबई इंडियन्सकडून खेळणारा भारताचा डावखुरा फिरकी गोलंदाज कृणाल पंड्या याने क्रिकेटमध्ये ६ चेंडूत सलग ६ षटकार मारण्याचा अनोखा पराक्रम करणार असल्याचे म्हटले आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हर्शल गिब्स, युवराज सिंग, कायरण पोलार्ड आणि अलीकडेच अमेरिकेच्या जसकरन सिंग यानेही पापुआ न्यू गिनीविरुद्ध एका षटकात ६ षटकार मारण्याचा पराक्रम केला आहे.
एका मुलाखतीदरम्यान जेव्हा कृणालला विचारले गेले की, त्याला भविष्यात कोणता विक्रम करायला आवडेल? त्या प्रश्नाला उत्तर देताना त्याने सांगितले की, ‘एका षटकात ६ षटकार मारण्याचे आपले ध्येय आहे आणि हा विक्रम आपल्या नावे करायला मला आवडेल.’
तत्पूर्वी, मुंबई इंडियन्स संघाने उत्तरार्धातील पहिला सामना चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध खेळला होता. त्यात त्यांना २० धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. तर दुसऱ्या सामन्यात त्यांना कोलकाता नाईट रायडर्सकडून पराभव स्विकारावा लागला. कोलकाताविरुद्धच्या सामन्यात फलंदाजीचे आमंत्रण स्वीकारल्यानंतर मुंबईने जोरदार फटकेबाजी केली. सलामीवीर रोहित शर्मा आणि क्विंटन डी कॉक यांनी दमदार फटकेबाजी करत पॉवरप्लेमध्ये ५६ धावा कुटल्या होत्या. मुंबईच्या डावात उल्लेखनीय बाब म्हणजे, क्विंटन डी कॉकने आपल्या आयपीएल कारकिर्दीचे १६ वे अर्धशतक ३७ चेंडूत पूर्ण केले. मात्र, तो १५ व्या षटकाच्या ५ व्या चेंडूवर प्रसिद्ध कृष्णाचा बळी ठरला. सुनील नरेनने शानदार झेल घेत त्याची शानदार खेळी संपवली.
डी कॉकने ४२ चेंडूत ४ चौकार आणि 3 षटकारांसह ५५ धावा केल्या. तत्पूर्वी, रोहित आणि डी कॉकने पहिल्या विकेटसाठी ९.२ षटकांत ७८ धावांची शानदार भागीदारी करून मुंबई इंडियन्सला दमदार सुरुवात करून केली. रोहित ३३ धावा करून बाद झाला. सुर्यकुमार यादवने ५ धावा केल्या तर ईशान किशन १४ धावा केल्या. पोलार्डने २१ धावांची खेळी केली तर कृनाल पांड्या १२ धावांवर बाद झाला. सौरव तिवारी ५ धावा करून नाबाद राहिला. कोलकाताच्या राहुल त्रिपाठी आणि व्यंकटेश अय्यर यांनी संघाच्या विजयासाठी अर्धशतके करत विजयावर शिक्कामोर्तब केले. अय्यरने ५३ धावा केल्या तर त्रिपाठीने ७४ धावा केल्या.
महत्त्वाच्या बातम्या-
हे ‘स्लो ओव्हर रेट’ म्हणजे काय रे भावड्या? भल्याभल्या संघनायकांनाही याच्या भितीने फुटतोय घाम
सीएसकेविरुद्ध कोहली ‘हे’ अस्त्र काढणार बाहेर! गोलंदाजी करतो तब्बल १५४ किमी ताशी वेगाने