सध्या भारत आगामी टी२० विश्वचषकाची तयारी करण्यात व्यस्त आहे. अशा परिस्थितीत अनेक खेळाडू आपल्याला भारतीय संघात स्थान मिळावे यासाठी जोर लावताना दिसत आहेत. यासाठी खेळाडू वेगवेगळ्या पर्यायांचा अवलंब करताना दिसत आहेत. अशातच आता भारताचा फिरकीपटू क्रुणाल पंड्या इंग्लंडमध्ये काऊंटी क्रिकेट खेळताना दिसणार आहे. स्वत: क्रुणालनेच ही माहिती देली आहे.
क्रुणाल पंड्या यंत्या २ ऑगस्ट पासून सुरू होणाऱ्या रायल लंडन कप मध्ये वारकिशायर संघाकडून खेळताना दिसणार आहे. ३१ वर्षीय क्रुणालने स्वत:च्या ट्वीटर अकाउंट वरून ट्विट करत ही माहिती दिली आहे. याशिवाय भारतीय खेळाडूंपैकी चेतेश्वर पुजारा आणि वॉशिंग्टन सुंदर हे देखील या स्पर्धेत खेळताना दिसणार आहेत.
A new journey and a new challenge awaits! Looking forward to a new chapter with @WarwickshireCCC 😊 Let’s go, Bears 💪 pic.twitter.com/O5MXZhQ83d
— Krunal Pandya (@krunalpandya24) July 1, 2022
दरम्यान, सध्या क्रुणाल पंड्या सध्या खराब फॉर्मशी झुंजत आहे. त्यामुळे भारतीय संघात पुनरामगन करण्यासाठी फॉर्ममध्ये परतणे आवश्यक आहे. त्यामुळे तो सध्या काऊंटी क्रिकेट खेळून स्वत:चा गेलेला फॉर्म परत आणण्यास मदत करू शकतो.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
शरद पवारांना धक्का! महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद बरखास्त; वाचा कारण
रिषभ पंतने शतक करताच द्रविडचा दिसला कधीच न पाहिलेला अवतार, Video व्हायरल
ENGvsIND: पंत-जडेजा जोडीची कमाल सचिन-अझरूद्दीनच्या ‘त्या’ २५वर्षे जुन्या विक्रमाशी केली बरोबरी