इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल ही अशी क्रिकेट स्पर्धा आहे, जिथे एकाच देशाचे खेळाडू एकमेकांविरुद्ध सामने खेळण्यासाठी मैदानात उतरतात. आयपीएलमध्ये दोन भावांच्या जोड्याही एका संघाकडून किंवा एकमेकांविरुद्ध खेळताना दिसल्या आहेत. चाहर बंधू (दिपक चाहर- राहुल चाहर), करन बंधू (सॅम करन- टॉम करन) हे वेगवेगळ्या आयपीएल फ्रँचायझीचे प्रतिनिधित्त्व करतात. मात्र आयपीएलमधील भावांची सर्वात प्रसिद्ध जोडी म्हणजेच पंड्या बंधू यांच्याबाबत पहिल्यांदाच असे घडले आहे.
हार्दिक पंड्या (Hardik Pandya) आणि कृणाल पंड्या (Krunal Pandya) हे आजवर आयपीएलमध्ये एकाच फ्रँचायझीकडून खेळत होते. मात्र आयपीएल २०२२ च्या (IPL 2022) हंगामात पहिल्यांदाच ते वेगवेगळ्या संघांचा भाग असून ते नुकतेच आमने-सामनेही आले होते. सोमवारी (२८ मार्च) गुजरात टायटन्स विरुद्ध लखनऊ सुपरजायंट्स (LSG vs GT) यांच्यात आयपीएल २०२२चा (IPL 2022) चौथा सामना झाला. या सामन्यादरम्यान एकमेकांविरोधात खेळताना कृणालने हार्दिकची विकेटही (Krunal Took Hardik’s Wicket) घेतली. मात्र त्यानंतर तो जल्लोष साजरा करताना दिसला नव्हता.
त्याचे झाले असे की, यंदाच्या हंगामात हार्दिक गुजरात संघाचा कर्णधार आहे, तर कृणालला लखनऊ संघाने विकत घेतले आहे. सोमवारी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर आमने सामने आल्यानंतर कृणालने आपला छोटा भाऊ हार्दिकला झेलबाद केले. लखनऊच्या १५९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हार्दिक ३३ धावांवर खेळत होता. अशावेळी डावातील ११ व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर मनिष पांडेच्या हातून कृणालने हार्दिकला झेलबाद केले.
व्हिडिओ पाहण्यासाठी लिंकवर क्लिक करा-
https://www.iplt20.com/video/41455/m04-gt-vs-lsg–hardik-pandya-wicket?tagNames=2022
षटकातील पहिल्याच चेंडूवर विकेट मिळाली, तीही आपल्या छोट्या भावाची, हे पाहून कृणाल गोंधळून गेला. त्याला या विकेटचा जल्लोष साजरा करू की भावासाठी हताश होऊ हे समजत नव्हते. त्यामुळे तो तोंडावर हात ठेवून आश्चर्य व्यक्त करताना दिसला. त्याच्या या प्रतिक्रियेची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.
All-Pandya Dismissal Update:
Krunal – 1️⃣
Hardik – 0️⃣Next round #AavaDe: 10th May ????️#GTvLSG #TATAIPL #Bhaivalry pic.twitter.com/SoFlzE29ik
— Gujarat Titans (@gujarat_titans) March 28, 2022
Krunal didn't celebrate after taking the wicket of Hardik. pic.twitter.com/2QEbXS56yn
— Johns. (@CricCrazyJohns) March 28, 2022
Krunal Pandya's reaction when he picked his brother Hardik Pandya's wicket. pic.twitter.com/qEcv37KPL4
— Tanuj Singh (@ImTanujSingh) March 28, 2022
कृणालने विकेट घेतल्यानंतर काय म्हणाला हार्दिक?
या सामन्यानंतर हार्दिकला विचारण्यात आले की, कृणालने विकेट घेतल्यानंतर काय भावना होत्या. त्यावर हार्दिक म्हणाला, ‘जर आम्ही सामना पराभूत झालो असतो, तर मला कृणालच्या गोलंदाजीवर बाद होण्याचं जास्त वाईट वाटलं असतं. त्यामुळे आमच्या कुटुंबात याबद्दल समतोल भावना आहेत की, त्याने मला बाद केले आणि मी सामना जिंकला.’
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएलला नावं ठेवणाऱ्यांनो; IPLमधून देशाला काय मिळतं? बातमी वाचा समजेल
कृणालने बाद केल्यानंतर काय वाटले? हार्दिक म्हणतो, ‘जर आम्ही पराभूत झालो असतो तर…’





