---Advertisement---

उपकर्णधार अजिंक्य रहाणेचे कुलदीप यादवच्या सहभागाबद्दल मोठे वक्तव्य

On: सोमवार, जुलै 30, 2018 7:19 PM
---Advertisement---

बर्मिंघहम । भारत विरुद्ध इंग्लंड पहिला कसोटी सामना १ आॅक्टोबरपासून सुरु होत आहे. टीम इंडियाच्या या दौऱ्याची माध्यमांसह सगळीकडेच मोठी चर्चा होत आहे.

भारतीय संघात प्रथमच चांगली गोलंदाजीची फळी आहे. रविचंद्रन अश्विन, रविंद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव, कुलदीप यादव, शार्दुल ठाकूर आणि हार्दिक पंड्या सारख्या गोलंदाजांची या दौऱ्यासाठी टीम इंडियामध्ये निवड झाली आहे.

या संघातील अनेक खेळाडूंचा हा पहिलाचा इंग्लंड दौरा आहे परंतु त्यांनी केलेल्या चांगल्या कामगिरीमुळेच त्यांची संघात निवड झालेली आहे.

अजिंक्य रहाणेच्याच नेतृत्वाखाली कसोटी पदार्पण करणाऱ्या कुलदीप यादवच्या सहभागाबद्दल विचारले असता त्याला संधी देण्याच संकेतच रहाणेने एकप्रकारे दिले आहे.

“मला टीम इंडियाचे फिरकीचे काय समीकरण असले माहीत नाही. परंतु कुलदीप यादव हा एक्स फॅक्टर ठरणार आहे. त्याने टी२० आणि वनडे मालिकेत चांगली कामगिरी केली आहे. तरीही आम्हाला खेळपट्टी पाहुन कुणाला संधी द्यायची हे पहावे लागेल. “असे तो म्हणाला.

अश्विन-जडेजाचे काय?

आपल्याला अश्विन आणि जडेजाला विसरुन चालणार नाही. ते भारतासाठी आजपर्यंत चांगले खेळत आले आहे. अश्विन चांगली फलंदाजी आणि गोलंदाजी करत आहे, असेही तो म्हणाला.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या-

-वाढदिवस विशेष- बर्थडे बाॅय जेम्स अॅंडरसनबद्दल माहित नसलेल्या १० गोष्टी

-खेळात मैत्री नाहीच! आयपीएलमधील मैत्री विसरुन हा खेळाडू आता काढणार भारतीय गोलंदाजांची पिसे

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment