आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) बुधवारी (12 ऑक्टोबर) आपली खेळाडूंची साप्ताहिक अद्यावत वैयक्तिक क्रमवारी जाहीर केली. नुकत्याच संपलेल्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका वनडे मालिकेनंतर या क्रमवारीत अनेक बदल झाले आहेत. वनडे मालिकेतील अखेरचा सामना गाजवलेल्या कुलदीप यादव याने या क्रमवारीत मोठी उडी घेतली आहे. त्याचवेळी भारताच्या इतर अनुभवी फलंदाजांच्या क्रमवारीत घसरण झाल्याचे दिसून येतेय.
अखेरच्या दिल्ली वनडेत कुलदीप यादवने धारदार गोलंदाजी करत 4 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. मालिकेच्या पहिल्या दोन सामन्यातही त्याने बळी मिळवलेले. या कामगिरीनंतर त्याने सात स्थानांची उडी घेत 25 वे स्थान काबीज केले. त्याचवेळी या मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व केलेल्या शिखर धवनला मात्र 6 स्थानांचे नुकसान सोसावे लागले. त्याची घसरण होत तो 17 व्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याला या मालिकेत केवळ 25 धावा करता आल्या होत्या. या मालिकेला अनुपस्थित असलेल्या विराट कोहली व रोहित शर्मा यांना देखील प्रत्येकी एका स्थानाचे नुकसान झाल्याने ते अनुक्रमे सातव्या व आठव्या क्रमांकावर पोहोचले. फलंदाजांच्या वनडे क्रमवारीत अद्याप पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम हाच पहिल्या क्रमांकावर आहे. तर गोलंदाजांच्या वनडे क्रमवारीत न्यूझीलंडचा अनुभव वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने आपले स्थान मजबुतीने टिकवून ठेवलेय.
फलंदाजांच्या टी20 क्रमवारी पहिल्या चार स्थानिक कोणताही बदल झाला नाही. पाकिस्तानचा मोहम्मद रिझवान, भारताचा सूर्यकुमार यादव, पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम व दक्षिण आफ्रिकेचा ऐडन मार्करम हे पहिल्या चार क्रमांकावर आहेत. पाचव्या क्रमांकावर न्यूझीलंडचा डेवॉन कॉनवे तर सहाव्या क्रमांकावर इंग्लंडचा जोस बटलर हे पोहोचले आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘ते दोघं वनडेत पंतची जागा घेऊ शकत नाहीत’, भारतीय दिग्गजाने कुणाबद्दल केले मोठे वक्तव्य?
टी20 विश्वचषकापूर्वी भारतीय संघाला नाही तसलं बोलला इंग्लंडचा दिग्गज, वाचून तळपायाची आग जाईल मस्तकात