पुढील महिन्यात भारतीय क्रिकेट संघ बांगलादेश दौऱ्यावर जाणार आहे. या छोट्याखानी दौऱ्यावर भारतीय संघ तीन वनडे व दोन कसोटी सामन्यांच्या मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाची निवड काही दिवसांपूर्वी झाली होती. या संघात निवड झालेला अष्टपैलू रवींद्र जडेजा हा दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर झाला आहे. त्यामुळे भारतीय संघात दोन नवीन नावांना संधी मिळाली. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) याबाबतची अधिकृत घोषणा नुकतेच केली.
Update: Team India (Senior Men) and India A squad for Bangladesh tour announced.
Mored details here – https://t.co/VnBdNf60mN #TeamIndia
— BCCI (@BCCI) November 23, 2022
आशिया चषकात झालेल्या दुखापतीतून जडेजा अद्याप सावरलेला नाही. शस्त्रक्रियेनंतर त्याला आणखी विश्रांतीची गरज आहे. त्यामुळे त्याच्या जागी वनडे संघात बंगालचा अष्टपैलू शाहबाज अहमद याची वर्णी लागली. दुसरीकडे वनडे संघात प्रथमच निवड झालेला उत्तर प्रदेशचा उमदा वेगवान गोलंदाज यश दयाल हा पाठीच्या दुखापतीमुळे या दौऱ्याला मुकणार आहे. त्याच्याजागी आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स व सध्या सुरू असलेल्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये मध्य प्रदेशसाठी उत्कृष्ट कामगिरी करणारा वेगवान गोलंदाज कुलदीप सेन याची निवड केली आहे. यासोबतच भारत अ संघाची देखील घोषणा केली गेली.
बांगलादेश दौऱ्यासाठी भारताचा कसोटी संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, रिषभ पंत (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव.
बांगलादेश दौऱ्यासाठी भारताचा वनडे संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, राहुल त्रिपाठी, रिषभ पंत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), शाहबाज अहमद, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, दीपक चहर, कुलदीप सेन.
(Kuldeep Sen And Shahbaz Ahmed Included In Bangladesh ODI)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पूरननंतर आता कोण करणार वेस्ट इंडिज संघाचे नेतृत्व? ‘या’ खेळाडूचे नाव चर्चेत
भारत- बांगलादेशमधील तिसऱ्या वनडेच्या दिवशीच आंदोलन, यजमानांच्या बोर्डाने घेतला ‘हा’ निर्णय