क्रिकेट सामन्यादरम्यान बऱ्याचदा खेळाडू फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाव्यतिरिक्त इतर गोष्टीही करताना दिसतात. जसे की, विकेट घेतल्यानंतर किंवा मोठी खेळी केल्यानंतर विशेष सेलिब्रेशन, मैदानावर एखादी डान्स स्टेप करणे, इत्यादी. शनिवारी (२६ फेब्रुवारी) भारत विरुद्ध श्रीलंका (IND vs SL) यांच्यात धरमशालाच्या हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर दुसरा टी२० सामना (Second T20I) झाला. या सामन्यादरम्यान भारताच्या प्लेइंग इलेव्हनचा भाग नसलेल्या खेळाडूंनी सामना दर्शकांचे लक्ष वेधले आहे.
भारतीय गोलंदाज मोहम्मद सिराज (Mohammad Siraj) आणि कुलदीप यादव (Kuldeep Yadav), जे दुसऱ्या टी२० सामन्यात भारताच्या अंतिम एकादशचा भाग नव्हते त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मैदानावर न उतराही हे खेळाडू लाईमलाईटमध्ये येण्यामागचे कारण त्यांनी केलेली मस्ती होते. या गोलंदाजांनी मैदानी पंच जयारमन मदनगोपाल यांची नक्कल (Siraj And Kuldeep Copying Umpire) केली. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
ही घटना दुसऱ्या टी२० सामन्यातील श्रीलंकेच्या डावामधील १० व्या षटकात घडली. या षटकातील पाचव्या चेंडूवर फिरकीपटू युझवेंद्र चहलने श्रीलंकेचा चरिथ असलांकाला पायचित केले होते. यानंतर श्रीलंकेच्या खेळाडूंनी डीआरएससाठीही अपील केली होती. परंतु तिसऱ्या पंचांनी त्याला शेवटी बादच दिले. जेव्हा तिसऱ्या पंचांनी मैदानी पंच मदनगोपाल यांना त्यांच्या निर्णयावर कायम राहण्यास सांगितले, तेव्हा मैदानावर ड्रिंक्स घेऊन सिराज आणि कुलदीप धावत आले होते.
यावेळी हे दोन्ही खेळाडू पंचांनी बाद देण्याआधी त्यांच्या मागे धावत गेले आणि त्यांच्यामागे बादचा इशारा करत उभे राहिले. सुरुवातीला सिराजने अशी कृती केली. त्यानंतर कुलदीप धावत पंचांच्या मागे जाऊन मस्ती करताना दिसला. यावेळी धावत असताना पंचांचा हाताचा कोपरा कुलदीपच्या पोटाला लागला. सुदैवाने त्याला जास्त गंभीर दुखापत झाली नाही आणि तो खाली पडण्यापासून वाचला.
These guys 🤣#indvsl pic.twitter.com/3p4T9O4JUV
— vel (@velappan) February 26, 2022
दरम्यान भारतीय संघाने श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात एकतर्फी विजय मिळवला होता. भारतीय संघाने हा सामना ६२ धावांनी जिंकला होता. त्यानंतर दुसऱ्या टी२० सामन्यातही विजय मिळवत भारतीय संघ मालिका खिशात घालण्यासाठी प्रयत्नशील दिसला.
महत्त्वाच्या बातम्या-
‘ही’ खेळाडू असेल आगामी विश्वचषकातील टीम इंडियाची उपकर्णधार, मिताली राजने सांगितले नाव
फलंदाजीत सोडा, हिटमॅन रोहितचं क्षेत्ररक्षणातही अर्धशतक, बनला पहिलाच भारतीय; बघा तो खास क्षण