दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात बुधवारी झालेल्या सामन्यात यजमान दिल्ली संघाने गुजरातवर शानदार विजय मिळवला. दिल्लीने या सामन्यात गुजरातचा त्यांच्या घरच्या मैदानावर पराभव केला. हा सामना गोलंदाजांच्या प्रयत्नांनी दिल्लीने आपल्याकडे खेचून आणला. परंतू दिल्लीच्या गोलंदाजीवेळी झालेला एकप्रकार सध्या खुप चर्चेत आहे.
दिल्ली कॅपिटल्सला गुजरात टायटन्सने दिलेले 90 धावांचे माफक लक्ष्य केवळ 8.5 षटकांत पूर्ण केले. रिषभ पंतच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्सने संपूर्ण सामन्यात आपली जबरदस्त कामगिरी दाखवली. गोलंदाजांनी गुजरात टायटन्सच्या फलंदाजांना 100 धावाही करू दिल्या नाही. नंतर फलंदाजी करताना दिल्लीने हे सोपे लक्ष्य सहज गाठले. पण या सामन्यात कुलदीप यादव दिल्ली संघातील सहकारी मुकेश कुमारवर भडकला होता. ( Kuldeep Yadav Angry At Mukesh Kumar In Live Match DC Vs GT Watch Video Ipl 2024 )
कुलदीप यादव सहकारी खेळाडू मुकेश कुमारवर चांगलाच भडकला होता. कुलदीप यादव रागाने त्याला, ‘तू वेडा आहेस का?’ असे म्हटले होते. त्यानंतर रिषभ पंत त्याच्या जवळ जात कुलदीपला शांत कले. हा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय. आठव्या षटकात राहुल तेवतिया आणि अभिनवची जोडी मैदानावर असताना ही संपूर्ण घटना घडली.
पाहा तो व्हिडिओ –
Angry 💢 kullu 😭😭 pic.twitter.com/y7NQy1NQD3
— RITIKA RO 45 (@RITIKAro45) April 17, 2024
*Mukesh Kumar fields the ball on a quick single*
Pant: “Maaaaar”
Kuldeep: “Maar kyun rha hai pagal hai kya”
Pant few seconds later: “Gussa nahi, gussa nahi”
— Shubh Aggarwal (@shubh_chintak) April 17, 2024