---Advertisement---

कुलदीपने पुन्हा टाकला ‘ड्रीम बॉल’! काही कळायच्या आत मार्करमची दांडी गुल; पाहा व्हिडिओ

On: गुरूवार, ऑक्टोबर 6, 2022 6:29 PM
---Advertisement---

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्या दरम्यानचा पहिला वनडे सामना गुरूवारी (6 ऑक्टोबर) लखनऊच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी इकाना क्रिकेट स्टेडियमवर सुरू झाला. या मालिकेत भारताचा नियमित कर्णधार रोहित शर्मा याच्या अनुपस्थित शिखर धवन संघाचे नेतृत्व करतोय. या सामन्यात शिखरने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. दक्षिण आफ्रिकेच्या डावात भारताचा अनुभवी चायनामन फिरकीपटू कुलदीप यादवने दक्षिण आफ्रिकेचा प्रमुख फलंदाज ऐडन मार्करम याला बाद करताना टाकलेल्या चेंडूचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

प्रथम फलंदाजी संधी मिळालेल्या दक्षिण आफ्रिकेसाठी जानेमन मलान व क्विंटन डी कॉक यांनी 49 धावांची सलामी दिली. मलान बाद झाल्यानंतर कर्णधार टेंबा बवुमाही फारसा टिकू शकला नाही. तो बाद झाल्यावर मैदानात भरवशाचा ऐडन मार्करम याचे आगमन झाले. त्याच्यावर कुलदीप यादवने चांगलाच दबाव टाकत चार चेंडू निर्धाव काढले. सोळाव्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर त्याने मार्करमला असे फसवले की, मार्करमसह चाहते देखील झाले. अगदी पुढे टाकलेला चेंडू त्याने वळवत थेट स्टंप्सचा वेध घेतला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

 

त्याच्या या चेंडूनंतर अनेकांना त्यानेच 2019 वनडे विश्वचषकात टाकलेल्या एका चेंडूची आठवण झाली आहे. कुलदीपने त्या विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध बाबर आझमला देखील अशाच पद्धतीने बाद केले होते.

 

कुलदीपने बऱ्याच कालावधीनंतर भारतीय संघात पुनरागमन केले आहे. दुखापत आणि खराब फॉर्म यामुळे त्याला बराच काळ संघातून बाहेर राहावे लागले होते. त्याला टी20 विश्वचषकासाठी संघात जागा मिळाली नाही. आगामी विश्वचषकात भारतीय संघासाठी खेळण्याचे आपण लक्ष ठेवले असल्यास त्याने म्हटले होते.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
INDvSA: ‘विराट कोहली आणि रोहित शर्मा माझे आदर्श’, पहिल्या वनडेपूर्वीच खेळाडूचे मोठे वक्तव्य
पांढरे केस, पांढरे जॅकेट अन् हातात माईक, रिची बेनो बोलायला लागले की, ऐकणाऱ्याचे कान व्हायचे तृप्त

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---