झिम्बाब्वे, पाकिस्तान आणि आॅस्ट्रेलिया यांच्यात तिरंगी टी20 मालिका सुरु आहे. या मलिकेत गुरवारी, 6जुलैला आॅस्ट्रेलिया विरुद्ध झिम्बाब्वे संघात पार पडलेल्या टी20 सामन्यात आॅस्ट्रेलियाने 5 विकेट्सने विजय मिळवला.
याबरोबरच या सामन्यात आॅस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज अँड्र्यू टायने 3 विकेट्स घेऊन एक खास विक्रम केला आहे. तो आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये सलग 4 सामन्यात 3 किंवा त्यापेक्षा जास्त विकेट्स घेणारा श्रीलंकेच्या अजंता मेंडीस नंतरचा दुसराच खेळाडू ठरला आहे.
त्याने झिम्बाब्वे विरुद्धच्या सामन्यात 28 धावा देत 3 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच त्याने या तिरंगी टी20 मालिकेत आॅस्ट्रेलियाच्या पहिल्या तीन टी20 सामन्यातही प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या आहेत.
मात्र त्याच्या या विक्रमाची पुढच्या काही तासातच बरोबरी होऊ शकते. कारण भारताचा फिरकीपटू कुलदिप यादवनेही आत्तापर्यंच सलग 3 सामन्यात 3 पेक्षा जास्त विकेट्स घेतल्या आहेत.
तसेच गुरवारी भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या टी20 सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 10 वाजता सुरुवात होणार आहे. त्यामुळे कुलदिपला या सामन्यात टायच्या या विक्रमाशी बरोबरी करण्याची संधी आहे.
कुलदिपने आयर्लंडविरुद्ध अनुक्रमे 27 आणि 29 जुनला झालेल्या पहिल्या आणि दुसऱ्या टी20 सामन्यात प्रत्येकी 4 आणि 3 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच त्याने 3 जुलैला इंग्लंड विरुद्ध झालेल्या पहिल्या टी20 सामन्यात 5 विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
-उद्या ३७वा वाढदिवस साजरा करणाऱ्या धोनीला आज ३ खास विक्रम साजरे करण्याची संधी
-तब्बल सहा महिन्यानंतर मोहम्मद शमीच्या आयुष्यात चांगली घटना
-सुरेश रैनाला आज एबी डेविलियर्सला मागे टाकण्याची संधी