वेस्ट इंडीज विरुद्ध भारत संघात आजपासून(7 ऑगस्ट) तीन सामन्यांची वनडे मालिका सुरु होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना आज प्रोविडन्स स्टेडीयम, गयाना येथे होणार आहे.
या 3 सामन्यांच्या वनडे मालिकेत भारताचा फिरकीपटू कुलदीप यादवला खास पराक्रम करण्याची संधी आहे. त्याने जर या मालिकेत 7 विकेट्स घेतले तर तो वनडेमध्ये सर्वात जलद 100 विकेट् घेणारा भारतीय गोलंदाज ठरेल. सध्या कुलदीपच्या नावावर 51 वनडे सामन्यात 93 विकेट्स आहेत.
तसेच वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी सध्या वनडेत सर्वात जलद 100 विकेट् घेणारा भारतीय गोलंदाज आहे. शमीने 56 वनडे सामन्यात 100 वनडे विकेट्सचा टप्पा गाठला होता. या यादीत शमीपाठोपाठ जसप्रीत बुमराह आहे. बुमराहने 57 सामन्यात 100 वनडे विकट्सचा टप्पा पूर्ण केला होता.
तसेच वनडे क्रिकेटच्या इतिहासात जगातील एकूण गोलंदाजांमध्ये सर्वात जलद 100 विकेट्स घेण्याचा विश्वविक्रम राशीद खानच्या नावावर आहे. राशीदने 44 सामन्यात 100 वनडे विकेट्स पूर्ण केल्या होत्या.
#वनडेत सर्वात जलद 100 विकेट्स घेणारे भारतीय गोलंदाज –
56 सामने – मोहम्मद शमी
57 सामने – जसप्रीत बुमराह
59 सामने – इरफान पठाण
65 सामने – झहीर खान
67 सामने – अजीत अगरकर
68 सामने – जवागल श्रीनाथ
#वनडेत सर्वात जलद 100 विकेट्स घेणारे गोलंदाज –
44 सामने – राशीद खान
52 सामने – मिशेल स्टार्क
53 सामने – साक्लेन मुश्ताक
54 सामने – शेन बॉन्ड, मुस्तफिजूर रेहमान
55 सामने – ब्रेट ली
56 सामने – ट्रेट बोल्ट, मोहम्मद शमी
57 सामने – जसप्रीत बुमराह
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–या कारणामुळे ख्रिस गेल आजचा सामना कधीही विसरणार नाही…
–एका टी२० सामन्यात तब्बल ७ विकेट्स घेत या गोलंदाजाने रचला इतिहास, पहा व्हिडिओ
–अबब !! प्रो कबड्डीमधील तब्बल ११ मोठे विक्रम डुबकी किंग परदीप नरवालच्या नावावर