विश्वचषक 2023 स्पर्धेत रविवारी (29 ऑक्टोबर) भारत आणि इंग्लंड हे संघ आमनेसामने आलेले. लखनऊ येथील इकाना स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात इंग्लंडने भारताला 229 पर्यंत रोखले. या धावांचा बचाव करताना भारताला जसप्रीत बुमराह व मोहम्मद शमी यांनी शानदार सुरुवात करून देत इंग्लंडची टॉप ऑर्डर ढेर केली. त्यानंतर इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर याला बाद करताना भारताचा प्रमुख फिरकीपटू कुलदीप यादव यांनी स्पर्धेतील आत्तापर्यंतचा सर्वोत्तम चेंडू टाकला.
विजयासाठी केवळ 230 धावांचा पाठलाग करत असताना इंग्लंडची सुरुवात अत्यंत खराब झाली. त्यांचे पहिले चार फलंदाज पहिल्या दहा षटकात केवळ 40 धावा जोडून बाद झाले. त्यानंतर जोस बटलर व मोईन अली यांनी भागीदारी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, कुलदीपने ही भागीदारी फोडली.
Ball of the 2019 World Cup – Kuldeep Yadav to Babar Azam.
Ball of the 2023 World Cup – Kuldeep Yadav to Jos Buttler. pic.twitter.com/HsSsjp3oTd
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 29, 2023
इंग्लंडच्या डावातील 16 व्या षटक टाकण्यासाठी आलेल्या कुलदीपने पहिल्याच चेंडूवर बटलरचा त्रिफळा उडवला. त्याने ऑफ स्टंपच्या बाहेर टाकलेल्या या चेंडूने तब्बल 7.2 अंश इतके जबरदस्त वळण घेत मधल्या स्टंपचा वेध घेतला. हा स्पर्धेतील सर्वोत्तम चेंडू असल्याचे म्हटले जात आहे. कुलदीप याने यापूर्वी 2019 विश्वचषकात अशाच प्रकारचा चेंडू टाकून पाकिस्तानच्या बाबर आझम याला बाद केले होते. अनेकांना या चेंडूने त्यावेळीची देखील आठवण झाली.
भारताचा प्रमुख फिरकीपटू म्हणून या स्पर्धेत खेळत असलेल्या कुलदीपने आतापर्यंत सातत्यपूर्ण कामगिरी करत भारतीय संघासाठी प्रत्येक वेळी मोक्याच्या क्षणी बळी मिळवले आहेत.
(Kuldeep Yadav Clean Bowled Jos Buttler Declared Ball Of The Tournament)
महत्वाच्या बातम्या –
‘आमच्याही संघात जर स्कॉट एडवर्ड्ससारखा…’, नेदरलँड्सच्या विजय पाहून मोठी गोष्ट बोलला विंडीजचा दिग्गज
“रोहित स्वतःसाठी खेळला असता तर…”, गंभीरच्या त्या विधानाने उंचावल्या भुवया