विशाखापट्टणम | भारत विरुद्ध श्रीलंका तिसऱ्या वनडे सामन्यात भारताचा माजी कॅप्टन कूल एमएस धोनीची चपळाई पुन्हा एकदा समोर आली. यावेळी विजेच्या चपळाईने स्टंपिंग करत धोनीने उपुल तरंगाला बाद केले.
सत्ताविसाव्या षटकातील पहिल्या चेंडूवर फटका मारण्यासाठी तरंगानं क्रीज सोडलं. कुलदीपच्या या चेंडूनं तरंगाला चकवा दिला. धोनीनं ही संधी दवडली नाही, त्यानं तरंगाला क्रीजमध्ये येण्याआधीच यष्टिचीत केले.
धोनीच्या या स्टंम्पिंगची सोशल मीडियात चांगलीच चर्चा आहे. धोनीच्या सर्वात चांगल्या स्टम्पिंगपैकी हे एक स्टम्पिंग असल्याचं मानलं जात आहे.
ज्यावेळी तरंगा बाद झाला तेव्हा तो ९५ धावांवर खेळत होता. वनडेत आपल्या फॉर्मशी झगडत असलेल्या तरंगाला आपले १६वे शतक करण्याची मोठी संधी होती. परंतु धोनीमुळे त्याला आपल्या शतकाला मुकावे लागले.
Watch Video:
Dhoni Smart Stumping in 3rd ODI https://t.co/WsXFNMoP3w via @YouTube
— Varun B. (@ajbandekar) December 18, 2017
https://twitter.com/slimshady_ansh/status/942336076160540672?ref_src=twsrc%5Etfw&ref_url=https%3A%2F%2Fwww.thodkyaat.com%2Fms-dhoni-stumping-upul-taranga%2F