आयपीएल 2023 मध्ये गुरुवारी (20 एप्रिल) दुसरा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स असा खेळायला. पावसाच्या व्यत्ययामुळे उशिरा सुरू झालेल्या या सामन्यात दिल्लीने प्रथम गोलंदाजी करताना केकेआरला रोखले. दिल्ली येथील अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने हंगामातील आतापर्यंतची सर्वोत्तम गोलंदाजी करत केकेआरला 127 धावांवर सर्वबाद केले. दिल्लीचा अनुभवी फिरकीपटू कुलदीप यादव याने दोन बळी घेत आपले योगदान दिले.
नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर दिल्लीच्या गोलंदाजांनी नियमित अंतराने केकेआरचे फलंदाज बाद केले. वेगवान गोलंदाजांनी वरची फळी बाद केल्यानंतर कुलदीप यादव याने अत्यंत कंजूस गोलंदाजी केली. त्याने पंधराव्या षटकात सुनील नरीन व अनुकूल रॉय यांना लागोपाठच्या चेंडूवर तंबूत पाठवले. त्याने या सामन्यात केवळ तीन षटके गोलंदाजी करताना 15 धावांवर 2 गडी बाद केले.
कुलदीप मागील हंगामापासून दिल्ली संघाचा भाग आहे. तेव्हापासून दिल्ली विरुद्ध तीन सामने खेळताना 10 बळी मिळवले आहेत. मागील वर्षी झालेल्या दोन्ही सामन्यात त्याने प्रत्येकी चार बळी मिळवले होते. कुलदीप त्याआधी अनेक वर्ष केकेआर संघाचा भाग होता. मात्र, 2020 व 2021 या दोन हंगामात त्याला अधिक वेळा बाकावरच बसावे लागले. त्यामुळे तो एक प्रकारे आपल्या आधीच्या संघाकडून बदलाच घेत असल्याचे चित्र दिसत आहे.
या सामन्यात दिल्लीसाठी सर्वच गोलंदाजांनी दमदार कामगिरी केली. दोन वर्षानंतर आयपीएल सामना खेळत असलेल्या ईशांत शर्माने दोन बळी आपल्या नावे केले. एन्रिक नोर्कीए व अक्षर पटेल यांनी देखील दोन फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. त्यामुळेच दिल्ली या हंगामात प्रथमच विरोधी संघाला सर्वबाद करण्यात यशस्वी ठरला.
(Kuldeep Yadav Extream Performance Against KKR In IPL Last 3 Matches In IPL)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मुंबई शहर मौर्य मेवरीक्स संघाची मुंबई उपनगर मुर्थाल मॅग्नेट्स संघावर मात
प्रमोशन फेरीत कोल्हापूर ताडोबा टायगर्स संघाचा विजय