भारत आणि बांगलादेश या संघामध्ये चट्टोग्राम येथे पहिला कसोटी सामना खेळवला जात आहे. या सामन्यात भारताच्या कुलदीप याने इतिहास रचला आहे. 22 महिन्यांनंतर संघात पुनरागमन करणाऱ्या कुलदीपने अनिल कुंबळे आणि आर अश्विन यांचा विक्रम मोडून काढला. कुलदीपने बांगलादेश विरुध्द पहिल्या डावात 40 धावा देत 5 गडी बाद केले. बांगलादेश विरुद्धचे हे प्रदर्शन त्याच्या कारकीर्दीतील सर्वोत्तम प्रदर्शन आहे.
बांगलादेशमध्ये कसोटी सामन्यात सर्वश्रेष्ठ प्रदर्शन करण्याच्या विक्रमात नोंद करणारा कुलदीप यादव (Kuldeep Yadav ) पहिला भारतीय फिरकीपटू ठरला. चट्टोग्राम कसोटीच्या तिसऱ्या दिवशी डावखुऱ्या हाताच्या या चायनामन फिरकीपटूने ही कामगिरी केली. कुलदीपने 40 धावा देत 5 गडी बाद केले. याआधी हा विक्रम आर अश्विन (R. Ashwin) याच्या नावावर होता, ज्याने 2015मध्ये फतुल्लाह येथे 87 धावा देत 5 गडी बाद केले होते. अनिल कुंबळे (Anil Kumble) यांनी सर्वश्रेष्ठ प्रदर्शन चट्टोग्राममध्येच केले होते. त्यांनी या मैदानावर 55 धावा देत 4 गडी बाद केले होते.
बांगलादेशमध्ये 7गडी बाद करण्याचा विक्रम अजूनही झहीर खानच्या नावावर
बांगलादेशमध्ये एका भारतीयाकडून सर्वोत्कृष्ठ प्रदर्शन करण्याचा विक्रम झहीर खान (Zaheer Khan) याच्या नावावर आहे. झहीरने 2007मध्ये मीरपूर येथे 87 धावा देत 7 गडी बाद केले होते. कुलदीप यादव याने 22 महिन्यानंतर कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन केले आहे. त्याने आपला शेवटचा कसोटी सामना फेब्रुवारी 2021मध्ये खेळला होता. त्याने रेडबॉल क्रिकेटमध्ये तिसऱ्यावेळा एकाच डावात 5 गडी बाद केले आहेत. याआधी त्याने वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलिया या संघाविरुद्ध 5 विकेट हॉल घेतले आहे.
भारत आणि बांगलादेश या संघातील पहिल्या कसोटी सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. भारताने आपल्या पहिल्या डावात सर्वबाद 404 धावा केल्या. भारताकडून चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara), श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) आणि आर अश्विन (R. Ashwin) यांनी अर्धशतके झळकावली.(Kuldeep Yadav has surpassed Ashwin and Kumble in best bowling figures in Bangladesh)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अश्विनबाबत आईसलँड क्रिकेटचे खळबळजनक ट्वीट! वाचून तुम्हालाही बसेल धक्का
भारताच्या कुलदीपने बांगलादेशात गाडला झेंडा, ‘ही’ कामगिरी करणारा तो पहिला भारतीय