---Advertisement---

रोहितने दिली संधी, पण कुलदीपने भलत्याच खेळाडूचे गायले गुणगान; म्हणाला, ‘त्याने मला नेहमीच पाठिंबा दिला’

Kuldeep-Yadav
---Advertisement---

क्रिकेट विश्वात असे अनेक खेळाडू आहेत, ज्यांच्याकडे प्रतिभा असूनही त्यांना काही सामन्यातून बाहेर बसवले जाते. मात्र, जेव्हा ते पुनरागमन करतात, तेव्हा सर्वांची बोलती बंद केल्याशिवाय राहत नाही. असाच एक भारतीय खेळाडू आहे, ज्याने संधी मिळताच, त्या संधीचे सोने करून दाखवले आहे. तो खेळाडू इतर कुणी नसून भारतीय संघाचा चायनामन गोलंदाज कुलदीप यादव आहे. कुलदीपला मागील काही काळापासून खूप कमी संधी मिळत आहेत. मात्र, जेव्हाही तो मैदानावर उतरतो, तेव्हा स्वत:ला सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो. अशात श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात त्याने कमाल केली. तसेच, पाहुण्या संघाच्या 3 महत्त्वाच्या फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवून दिला. यासाठी त्याला सामनावीर पुरस्कारानेही गौरवण्यात आले. यानंतर त्याने रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यासमोर मनातली गोष्ट सांगितली आहे.

कुलदीप यादवची कमाल- धमाल
कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने श्रीलंका संघाविरुद्धच्या दुसऱ्या वनडेत कुलदीप यादव (Kuldeep Yadav) याला संधी दिली होती. त्याने प्लेईंग इलेव्हनमध्ये फक्त एक बदल करत युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) याच्या जागी कुलदीपला संधी दिली होती. यावेळी कुलदीपनेही कर्णधार आणि चाहत्यांच्या विश्वासाला तडा जाऊ दिला नाही. कुलदीपने 10 षटके गोलंदाजी करताना 51 धावा देत महत्त्वाच्या 3 विकेट्स खिशात घातल्या. यामुळे त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

कमी संधी मिळण्यावर काय म्हणाला कुलदीप
सामना विजयानंतर 28 वर्षीय कुलदीपच्या मनातील भावना ओठांवर आल्या. म्हणाला, “मी माझ्या प्रदर्शनाने खुश आहे. मला ज्या संधी मिळाल्या आहेत, त्यात मी माझ्या क्षमतेनिशी सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करतो. जेव्हाही तुम्ही खेळता, तेव्हा तुम्हाला लक्ष केंद्रित करायचे असते. यादरम्यान मी वास्तवात आपल्या गोलंदाजीचा आनंद लुटत आहे.” पुढे बोलताना तो म्हणाला की, “संघ रचना महत्त्वाची आहे. मी याबाबत जास्त विचार करत नाही. फक्त संधी मिळाल्यानंतर मी माझे सर्वोत्तम देण्यावर लक्ष देतो. तुम्हाला सतत काहीतरी नवीन करत राहण्याची गरज आहे. तुम्ही एकाच गतीने गोलंदाजी करू शकत नाही.”

चहलचे केले कौतुक
उत्तरप्रदेशच्या कानपूर येथे राहणाऱ्या कुलदीप याने म्हटले की, “मी माझ्या फलंदाजीवरही काम केले आहे. मला जेव्हाही कोणत्या सामन्यात संधी मिळत नाही, तेव्हा मी त्यावर लक्ष देतो. मागील एक वर्षात मी माझ्या फिटनेसवरही बरेच काम केले आहे. याचे पूर्ण श्रेय एनसीए प्रशिक्षकांना जाते. यातून मला लय येणे आणि अधिक आक्रमक बनवण्यात मदत मिळाली आहे.” यावेळी त्याने सर्वांसमोर चहलला पाठिंबा दिल्याबद्दल धन्यवाद म्हटले. तो म्हणाला की, “युजीने नेहमीच मला पाठिंबा दिला आहे. निश्चितच त्याला माहिती होते की, फलंदाज कसे खेळतात, कारण त्याने आधीचे सामने खेळले आहेत. त्यामुळे तो मला सल्ला देत राहतो.”

सहा वर्षांपूर्वी केले होते पदार्पण
देशांतर्गत क्रिकेटमध्ये उत्तर प्रदेश संघाकडून खेळणाऱ्या कुलदीपने 2017मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध धरमशाला येथे त्याचा पहिला कसोटी सामना खेळला होता. त्याच वर्षी त्याने वनडे आणि आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्येही यशस्वी पदार्पण केले होते. त्याने भारतीय संघाकडून आतापर्यंत 8 कसोटी, 74 वनडे आणि 25 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने कसोटीत 34 विकेट्स, वनडेत 122 विकेट्स आणि आंतरराष्ट्रीय टी20त 44 विकेट्स घेण्याचा कामगिरी केली आहे. (kuldeep yadav on yuzvendra chahal says he supported me always ind vs sl read more)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
चक दे इंडिया! विराट ते सचिन, ‘या’ दिग्गज क्रिकेटपटूंनी भारतीय हॉकी संघावर पाडला शुभेच्छांचा पाऊस
विराट आणि ईशानच्या डान्सने दणाणून सोडले ईडन गार्डन्स, बेधुंद होऊन नाचतानाचा व्हिडिओ भन्नाट व्हायरल

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---