भारतीय संघाला जुलै महिन्याअंती वेस्ट इंडिज दौऱ्यावर जायचे आहे. या दौऱ्यात उभय संघ ३ सामन्यांची वनडे आणि ५ सामन्यांची टी२० मालिका खेळणार आहेत. यातील टी२० मालिकेसाठी गुरुवारी (१४ जुलै) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) १८ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. या संघात चायनामन गोलंदाज कुलदीप यादव यालाही निवडले गेले आहे. अशात तो वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेतून भारताच्या टी२० संघात पुनरागमन करेल.
कुलदीपला (Kuldeep Yadav) त्याच्या आयपीएल २०२२ मधील (IPL 2022) प्रदर्शनाच्या जोरावर मागील मायदेशातील दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी (T20 Series) निवड केली गेली होती. परंतु या मालिकेत खेळण्यापूर्वीच नेट्समध्ये सराव करताना उजव्या हाताच्या बोटाला दुखापत झाल्याने तो एकही सामना न खेळता मालिकेतून बाहेर झाला होता. मात्र त्यानंतर त्याने राष्ट्रीय क्रिकेट अकादमी, बेंगलोर येथे आपला पुनर्वसन कार्यक्रम पूर्ण केला आहे. याचमुळे आता त्याला वेस्ट इंडिजविरुद्ध टी२० संघात (India Tour Of West Indies) निवडण्यात आले आहे.
आयपीएल २०२२ मध्ये केली होती कमाल
भारतीय संघातून सातत्याने आत-बाहेर होत राहिलेल्या कुलदीपने आयपीएल २०२२ मध्ये नेत्रदीपक प्रदर्शन करत निवडकर्त्यांना आपली दखल घेण्यास भाग पाडले होते. त्याने या हंगामात दिल्ली कॅपिटल्सकडून १४ सामने खेळताना २१ विकेट्स घेतल्या होत्या. त्याच्या याच प्रदर्शनामुळे त्याला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध संघात सहभागी केले होते. तेव्हा दुखापतीमुळे ती संधी हुकल्याने आता पुन्हा एकदा त्याला वेस्ट इंडिजविरुद्ध नियुक्त केले गेले आहे.
कुलदीप दीर्घ काळापासून भारतीय संघात पुनरागमन करण्याच्या प्रतिक्षेत होता. आता वेस्ट इंडिविरुद्ध प्लेइंग इलेव्हनमध्ये सहभागी केले गेल्यास तो कसे प्रदर्शन करेल? हे पाहावे लागेल.
Rohit Sharma (C), I Kishan, KL Rahul*, Suryakumar Yadav, D Hooda, S Iyer, D Karthik, R Pant, H Pandya, R Jadeja, Axar Patel, R Ashwin, R Bishnoi, Kuldeep Yadav*, B Kumar, Avesh Khan, Harshal Patel, Arshdeep Singh.
*Inclusion of KL Rahul & Kuldeep Yadav is subject to fitness.
— BCCI (@BCCI) July 14, 2022
वेस्ट इंडिज विरुद्धच्या टी२० मालिकेसाठी भारतीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, रिषभ पंत, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, कुलदिप यादव, आर अश्विन, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग.
केएल राहुल आणि कुलदीप यादव (फिटनेसबाबत अनिश्चितता)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
ENGvsIND: लॉर्ड्सवर होणाऱ्या महत्वाच्या वनडे सामन्यात कशी असेल खेळपट्टी आणि हवामान, वाचा सविस्तर
वेस्ट इंडिज विरुद्धच्या टी२० मालिकेसाठी टिम इंडियाची घोषणा, विराटसह ‘हा’ वेगवान गोलंदाज बाहेर
Video: टीम इंडियाला मिळाला एक नवा फिरकीपटू, इंग्लंडमध्ये दाखवतोयं आपले कौशल्य