दिल्ली कॅपिटल्स संघाने रविवारी (११ एप्रिल) कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध झालेला आयपीएल २०२२चा १९वा सामना ४४ धावांनी जिंकला आहे. दिल्लीच्या विजयाचा नायक राहिला, त्यांचा फिरकीपटू कुलदीप यादव. कुलदीपने त्याची जुनी फ्रँचायझी कोलकाताविरुद्ध शानदार प्रदर्शन करत एकप्रकारे आपल्याला संधी न देण्याचा सूड पूर्ण केला आहे. त्यातही त्याने उमेश यादवची विकेट घेण्यासाठी केलेले प्रयत्न उल्लेखनीय होते.
कुलदीप (Kuldeep Yadav) मागील हंगामात कोलकाता संघाचा (Kolkata Knight Riders) भाग होता. परंतु त्याला संघाने एकही सामना खेळण्याची संधी दिली नव्हती. त्यानंतर तो दुखापतीमुळे पूर्ण हंगामातून बाहेर झाला होता. मात्र आयपीएल २०२२ (IPL 2022)मध्ये दिल्ली संघाकडून (Delhi Capitals) तो शानदार प्रदर्शन करत आहे. त्याने आतापर्यंत ४ सामने खेळताना १० विकेट्सही घेतल्या आहेत. तसेच तो २ वेळा सामनावीरही राहिला आहे.
कोलकाताविरुद्धच्या सामन्यात (DC vs KKR) तर त्याने आयपीएल कारकिर्दीतील दुसरी सर्वोत्तम गोलंदाजी कामगिरी केली आहे. या सामन्यात त्याने कर्णधार श्रेयस अय्यरसह ४ महत्त्वपूर्ण विकेट्स घेतल्या. ४ षटके गोलंदाजी करताना केवळ ३५ धावा देत त्याने ही कामगिरी केली. यादरम्यान त्याने उमेश यादवला बाद करण्यासाठी आपल्याच गोलंदाजीवर घेतलेला झेल अतिशय अवघड होता. तरीही तो हा शानदार झेल टिपत सर्वांच्या कौतुकास पात्र ठरला आहे.
क्रिकेटविश्वातून उमटल्या अशा प्रतिक्रिया
कुलदीपच्या या शानदार प्रदर्शनानंतर माजी भारतीय क्रिकेटपटू वसिम जाफरने (Wasim Jaffer) कोलकाता संघावर निशाणा साधला आहे. त्याने कोलकाताला टॅग करत एक मीम शेअर केले आहे. ज्यावर हिंदी गाण्यातील ओळी टाकत लिहिले आहे की, ‘मुझे छोड़कर जो तुम जाआगे, बडा पछताओगे.’
.@imkuldeep18 to KKR this game: #KKRvDC #IPL2022 pic.twitter.com/CqfPIhAsF0
— Wasim Jaffer (@WasimJaffer14) April 10, 2022
तसेच कुलदीपने उमेश यादवचा अवघड झेल टिपल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकीपटू ब्रॅड हॉग (Brad Hogg) यानेही त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. ‘हा स्वत:च्याच चेंडूवर घेतला गेलेला आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ट झेल होता,’ असे हॉगने ट्वीटमध्ये लिहिले आहे.
Kuldeep Yadav Game changer @imkuldeep18 what a spell.. 💥💥💥💥 4 wickets 👏
— Harbhajan Turbanator (@harbhajan_singh) April 10, 2022
भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंग (Harbhajan Singh) यानेही कुलदीपवर स्तुतीसुमने उधळली आहेत. ‘कुलदीप गेमचेंजर आहे’, असे हरभजनने म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
रिटायर्ड आऊट म्हणजे काय रे भावा? आर अश्विनने आयपीएलमध्ये असेच बाद होत घडवलाय इतिहास
युजवेंद्र चहल १५० आयपीएल विकेट्स घेणारा सहावा गोलंदाज, जाणून घ्या अन्य ५ जणांची नावं