---Advertisement---

कुलदीपने गाजवला कॅरेबियन दौरा! भेदक गोलंदाजीने मिटवलं वर्ल्डकपचे टेन्शन

On: सोमवार, ऑगस्ट 14, 2023 12:37 PM
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाच्या वेस्ट इंडिज दौऱ्याची समाप्ती पराभवाने झाली. वेस्ट इंडीज आणि  भारत यांच्यातील अखेरचा टी20 सामना रविवारी (13 ऑगस्ट) खेळला गेला. फ्लोरिडामध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारतीय संघाला 8 गड्यांनी पराभव पत्करावा लागला. यासह मालिका वेस्ट इंडीजने आपल्या नावावर केली. यापूर्वी झालेली कसोटी मालिका भारतीय संघाने जिंकली होती. तर, या मालिकेत देखील भारतीय संघ संघर्ष करताना दिसला. असे असताना भारताचा फिरकीपटू कुलदीप यादव याने खऱ्या अर्थाने हा दौरा गाजवला.

कुलदीप या वर्षाच्या सुरुवातीपर्यंत भारतीय संघाचा नियमित सदस्य नव्हता. मात्र, श्रीलंकेविरुद्धची मालिका, त्यानंतर न्यूझीलंडविरुद्धची मालिका व ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतील सातत्यपूर्ण कामगिरी नेत्याने आपली संघातील जागा निश्चित केली. त्यामुळे या दौऱ्यावर त्याला वनडे व टी20 संघात स्थान मिळाले.

या दौऱ्यावरील पहिल्या वनडे सामन्यात त्याने केवळ 6 धावांमध्ये 4 गडी बात केले होते. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात एक तर तिसऱ्या सामन्यात दोन बळी मिळवण्यात त्याला यश आले. विशेष म्हणजे यावेळी त्याचा इकॉनोमी रेट 4 पेक्षा कमी राहिला.

टी20 मालिकेतील पहिल्या सामन्यात वीस धावा देऊन एक बळी मिळवण्यात त्याला यश आले. दुसऱ्या सामन्यात तो दुखापतीमुळे सहभागी होऊ शकला नव्हता. त्यानंतर तिसऱ्या सामन्यात 3 व चौथ्या सामन्यात 2 बळी मिळवण्यात त्याला यश आले. विशेष म्हणजे हे दोन्ही सामने भारतीय संघाने जिंकले. अखेरच्या सामन्यात त्याला बळी मिळाला नसला तरी त्याने केवळ 18 बळी मिळवले.

आगामी आशिया चषक वनडे विश्वचषकात या कामगिरीमुळे कुलदीपची जागा नक्की झाल्याचे दिसते. त्यामुळे युजवेंद्र चहल याला संघात संधी मिळते का हे पाहणे रंजक ठरेल.

(Kuldeep Yadav Shines In West Indies Tour Took Wickets In ODI And T20I Series)

महत्वाच्या बातम्या-  
आकडे बोलतायेत! 2021 पासून भारतीय संघाने अभिमान करावा अशी कामगिरी केलीच नाही
मालिका गमावली पण तिलक कमावला! टी20 मालिकेतून टीम इंडियाला मिळाला फ्युचर स्टार 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---