---Advertisement---

अफगाणिस्तान संघाला लाभला भारतीय गुरु! तब्बल 32 वर्षांचा अनुभव करणार शेअर

On: रविवार, ऑगस्ट 13, 2023 11:41 PM
---Advertisement---

अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने (ACB) आपल्या राष्ट्रीय संघासाठी नवीन नियुक्ती केली आहे. संघाचे फलंदाजी प्रशिक्षक म्हणून मिलाप प्रदीपकुमार मेवाडा यांना नियुक्त केले गेले. पाकिस्तान क्रिकेट संघाविरुद्धच्या वनडे मालिकेपूर्वी ते संघात सामील झाले आहेत. नुकत्याच झालेल्या अबुधाबी सराव शिबिरात आणि जुलैमध्ये बांगलादेश दौऱ्यादरम्यान अफगाणिस्तान संघासोबत वेळ घालवल्यानंतर त्यांना हे पद दिले गेले.

मिलाप मेवाडा 1996 ते 2005 पर्यंत बडोदा आणि पश्चिम विभाग संघाकडून भारतात देशांतर्गत क्रिकेट खेळले आहेत. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत 11 प्रथमश्रेणी आणि 26 लिस्ट ए सामने खेळले.

त्यांच्या प्रशिक्षणाच्या अनुभवाचा विचार केल्यास, मेवाडा यांनी हैदराबाद क्रिकेट असोसिएशन, छत्तीसगड राज्य क्रिकेट संघटना आणि जम्मू आणि काश्मीर क्रिकेट असोसिएशनच्या पुरुष वरिष्ठ राज्य संघांचे मुख्य प्रशिक्षक म्हणून काम केले आहे.  मिलाप व्हीव्हीएस स्पोर्टिंग अकादमी आणि बडोदा क्रिकेट असोसिएशनच्या कोचिंग सेटअपमध्ये देखील सामील आहेत. त्यांच्या खेळण्याचा आणि क्रिकेट प्रशिक्षणाचा 32 वर्षांचा एकत्रित अनुभव आहे.

(Milap Pradeep Kumar Mewada Becomes Afghanistan Cricket Team Batting Coach)

महत्वाच्या बातम्या –
विश्वचषकासाठी वनडे निवृत्तीतून माघार घेणार बेन स्टोक्स? लवकरच होणार संघाची घोषणा
वाद मिटला! स्वतः विराट म्हणाला, ‘बाबर जगात एक नंबर फलंदाज’, पहिल्या भेटीविषयी केला खुलासा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---