सलग तीन सामने जिंकणाऱ्या लखनऊ सुपर जायंट्स संघाला रिषभ पंतच्या दिल्ली कॅपिल्स संघाने शुक्रवारी (दि. 12) पराभवाचे पाणी चाखायला लावले. लखनऊच्या 168 धावांच्या आव्हानाचा यशस्वीरित्या पाठलाग करत दिल्लीने हंगामातील दुसरा विजय मिळवला. विजयाची हॅटट्रिक मारणाऱ्या लखनऊ संघाला त्यांच्याच मैदानावर दिल्लीकडून पराभव स्विकारावा लागला. ( Kuldeep Yadav Stump Breaking Delivery To Dismiss Nicholas Pooran Watch Video )
फलंदाजीत पृथ्वी शॉ, रिषभ पंत आणि जेक फ्रेजर-मॅकगर्क हे जरी दिल्लीच्या विजयाचे शिल्पकार ठरले असले. तरीही विजयाचा खरा पाया रचला तो गलंदाजांनीच. दिल्लीच्या गोलंदाजांनी लखनऊला 167 धावांवर रोखले. यात सर्वात प्रभावी गोलंदाजी केली ती कुलदिप यादवने. कुलदीपने 4 षटकात अवघ्या 20 धावा देत 3 बळी घेतलेत.
दिल्लीचा प्रमुख फिरकीपटू कुलदीप यादवने या सामन्यात कमालीची गोलंदाजी केली. लखनऊच्या आघाडीच्या फलंदाजाला त्याने तंबूत धाडले. चायनामन गोलंदाज कुलदीपने मार्कस स्टॉयनिस (8), निकोलस पूरन (0) आणि लोकेश राहुल (39) यांना बाहेरचा रस्ता दाखवला. कुलदीपने एकाच षटकात स्टॉयनिस आणि पूरन यांना बाद केले. त्यातही कुलदीपने मॅजिक चेंडू टाकून निकोलस पूरनला आपल्या जाळ्यात फसवले. लखनऊच्या फलंदाजीचा मेरूमणी असलेल्या पुरनला यावेळी कुलदीपने खाते देखील उघडून न देता त्याचा त्रिफळा उडाला.
𝗪𝗔𝗧𝗖𝗛 𝗢𝗡 𝗟𝗢𝗢𝗣! 🔄 😍
Kuldeep Yadav straight away unveiling his magic!👌👌
Watch the match LIVE on @JioCinema and @StarSportsIndia 💻📱#TATAIPL | #LSGvDC | @imkuldeep18 pic.twitter.com/pzfIQYpqnA
— IndianPremierLeague (@IPL) April 12, 2024
अधिक वाचा –
– हार्दिक पांड्याविषयी ‘हे’ काय बोलला ईशान किशन! जाणून घ्या एका क्लिकवर
– निवृत्तीच्या प्रश्नावर रोहित शर्माची गुगली! टीम इंडियातील भवितव्याबद्दल म्हणाला…
– आधी नतमस्तक झाला, मग मिठी मारली; मोहम्मद सिराजनं जसप्रीत बुमराहचा असा केला सन्मान, पाहा VIDEO