बांगलादेश विरुद्ध भारत (BANvIND) यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. यातील पहिला कसोटी सामना 14 डिसेंबरपासून चट्टोग्राम येथे खेळला जात आहे. ज्यामध्ये भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करताना चेतेश्वर पुजारा, श्रेयस अय्यर आणि आर अश्विन यांच्या अर्धशतकी खेळीमुळे सर्वबाद 404 धावांचा डोंगर रचला. प्रत्युत्तरात जेव्हा बांगलादेशचा संघ फलंदाजीस उतरला तेव्हा संघाने पहिल्याच चेंडूवर विकेट गमावली आणि विकेट्स पडण्याचे प्रकरण पुढे सुरूच राहिले. ज्यामुळे संघाचा पहिलाच डाव 55.5 षटकात 150 धावसंख्येवर संपुष्टात आला. यामुळे भारताला 254 धावांची भक्कम आघाडी मिळाली आहे.
यावेळी भारताकडून गोलंदाजी कुलदीप यादव (Kuldeep Yadav) आणि मोहम्मद सिराज यांनी प्रभावशाली कामगिरी केली. कुलदीपने 5 विकेट्स तर सिराजने 3 विकेट्स घेतल्या. उमेश यादव आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.
कुलदीपने बांगालदेशच्या पहिल्या डावात त्याच्या गोलंदाजीतील 16 षटकांमधील 6 षटके निर्धाव टाकली. त्याने 40 धावा देताना मुशफिकुर रहिम, शाकिब अल हसन, नुरूल हसन, तैजुल इस्लाम आणि ईबादत होसेन यांना बाद केले. यावेळी त्याचा इकॉनॉमी रेट 2.50 राहिला. त्याला सिराजने चांगली साथ दिली. सिराजने 13 षटके टाकताना 20 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. यावेळी त्याचा इकॉनॉमी रेट 1.50 असा राहिला. त्याने नजमुल शांतो, झाकिर हसन आणि लिटन दास यांना बाद केले.
Innings Break!
Bangladesh all out for 150.@imkuldeep18 shines with the ball with a brilliant fifer 👌👌#TeamIndia lead by 254 runs.
Scorecard – https://t.co/GUHODOYOh9 #BANvIND pic.twitter.com/KUjWrGnmys
— BCCI (@BCCI) December 16, 2022
भारताने यजमानांचा फॉलोऑन दिला नसून दुसऱ्यांदा फलंदाजी करण्यास मैदानात उतरला. खेळपट्टीवर कर्णधार केएल राहुल (KL Rahul) आणि शुबमन गिल आहेत.
तत्पूर्वी, या सामन्यात भारताकडून पहिल्या डावात पुजाराने 90 धावा, अय्यरने 86 धावा आणि अश्विनने 58 धावा केल्या होत्या. त्याचबरोबर कुलदीपने गोलंदाजीआधी फलंदाजीतही हात आजमावला. त्याने 5 चौकारांच्या साहाय्याने 40 धावा केल्या. रिषभ पंत (46) आणि उमेश यादव (नाबाद 15) यांनीही 100 पेक्षा अधिकच्या स्ट्राईक रेटने धावा केल्या. या डावात बांगालदेशकडून तैजुल आणि मेहदी हसन सर्वात यशस्वी ठरले. त्या दोघांनीही प्रत्येकी 4-4 विकेट्स घेतल्या. Kuldeep Yadav Takes 5 Wickets Hauls leaves Bangladesh batsmen reeling as hosts end first innings at 150
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बांगलादेशच्या विकेटकीपरने अश्विनला ‘असे’ बाद करून मैदानातच उडवली खिल्ली, व्हिडिओ व्हायरल
मुंबई सिटी एफसी पुन्हा नंबर वन बनण्यासाठी प्रयत्नशील, ईस्ट बंगाल एफसीचा करणार सामना