भारताचा युवा चायनामन गोलंदाज कुलदीप यादव सध्या क्रिकेट विश्वात चर्चेचा विषय बनला आहे.
कुलदीपने त्याच्या अविश्वसनीय कामगिरीने जगभरातील आजी माजी क्रिकेटपटूंना प्रभावित केले आहे.
यामध्ये आता इंग्लंडचा माजी कर्णधार अॅलेक स्टुअर्टची भर पडली आहे.
अॅलेक स्टुअर्टच्या मते भारतीय संघाने १ ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या इंग्लड विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात कुलदीप यादवला अंतिम ११ खेळाडूंच्या संघात स्थान मिळाल्यास तो इंग्लंडच्या फलंदाजांसमोर नक्किच आव्हान उभे करेल.
“कर्णधार म्हणून विराट खूप सकारात्मक आहे. तो कोणत्याही आक्रमक गोलंदाजाचे समर्थन करेल. मला वाटते, कुलदीपकडे रविंद्र जडेजा आणि आर. अश्विनपेक्षा गोलंदाजीत जास्त विविधता आहे. कुलदीपली संधी मिळाल्यास तो इंग्लिश फलंदाजांना नक्की आव्हान देईल. भारताला जर इंग्लंड मध्ये विजय मिळवायचा असेल तर कुलदीपला पर्याय नाही.” असे इंग्लंडचा माजी कर्णधार अॅलेक स्टुअर्ट म्हणाला.
भारत- इंग्लंड यांच्यात 1 ऑगस्टपासून पाच कसोटी सामन्यांची मालिका सुरु होत आहे.
या कसोटी मालिकेसाठी दोन्ही संघ जोरदार तयारीला लागले आहेत. भारतीय संघाने या इंग्लंड दौऱ्यात टी-20 मालिका 2-1 ने जिंकली होती, तर एकदिवसीय मालिकेत इंग्लंडने भारतावर 2-1 ने विजय मिळवला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
-एमएस धोनीचा हा निर्णय ऐकूण तुम्ही व्हाल थक्क
-अॅडम गिलक्रिस्टचा विश्वविक्रम मोडत क्विंटन डी कॉकने रचला…