---Advertisement---

मास्टर ब्लास्टर खूपच कमी गोलंदाजांचे असे कौतुक करतो!

On: बुधवार, जुलै 4, 2018 6:20 PM
---Advertisement---

मँचेस्टर। 3 जुलैला ओल्ड ट्रॅफर्ड स्टेडीयमवर भारताने इंग्लंड विरुद्ध पहिल्या टी20 सामन्यात 8 विकेट्सने विजय मिळवला. भारताचा चायनामन गोलंदाज कुलदिप यादव या विजयाचा शिल्पकार ठरला.

त्याने या सामन्यात 4 षटकात 24 धावा देत 5 विकेट्स घेतल्या. त्याच्या कामगिरीमुळे त्याला अनेकांकडून कौतुकाची थाप मिळाली. यात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरनेही कुलदिपच्या या कामगिरीचे ट्विट करुन कौतुक केले आहे.

त्याने ट्विटमध्ये म्हटले आहे की, ” कुलदिपची गोलंदाजी चांगली झाली. इंग्लंड त्याची रिस्ट गोलंदाजी समजण्यात अपयशी ठरले.”

https://twitter.com/sachin_rt/status/1014203881008648192

या सामन्यातील कुलदिपसाठी त्याचे तिसरे षटक खास ठरले. यात त्याने इंग्लंडच्या महत्त्वाच्या तीन विकेट्स घेतल्या. या षटकात त्याचे बळी ठरले ते इंग्लंड कर्णधार इयान मॉर्गन, जॉनी बेअरस्टो आणि जो रुट.

त्याने मिळवलेल्या 5 विकेट्समुळे त्याला या सामन्यातील सामनावीराचा पुरस्कारही मिळाला.

कुलदिपसाठी ठरली विक्रमी कामगिरी-

या सामन्यात कुलदिपने 5 विकेट्स घेताना काही विक्रमही केले. तो आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये एका सामन्यात 5 विकेट्स घेणारा भारताचा तिसराच गोलंदाज आहे. याआधी भुवनेश्वर कुमार आणि युजवेंद्र चहलने अशी कामगिरी केली आहे.

याबरोबरच तो आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये 5 विकेट्स घेणारा पहिला चायनामन गोलंदाज बनला आहे.

महत्त्वाच्या बातम्या: 

कुलदीप यादव- केएल राहुलच्या चर्चेत धोनीचा हा भीमपराक्रम दुर्लक्षित झाला

डेव्हीड वार्नर पुन्हा कर्णधार पदी

Video- या कारणामुळे फेडररला जगात चाहत्यांचे सर्वाधिक प्रेम मिळते

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment