कुमार गटाच्या आंतरराष्ट्रीय ग्रांप्री बॅडमिंटन स्पर्धेला बुधवारी (31 ऑगस्ट) सनसनाटी सुरूवात झाली. अव्वल मानांकित अनुपमा उपाध्यायला विजयासाठी झगडावे लागले, तर अन्य पाच मानांकित खेळाडूंना पराभवाचा सामना करावा लागला. पहिल्या दिवशी एकेरीत पाच, तर मिश्रदुहेरीत दोन परदेशी खेळाडूंचे आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात आले. मुलींच्या एकेरीच्या लढतीत अव्वल मानांकित अनुपमाला जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असणाऱ्या कर्निका श्रीस सुरेश हिचे आव्हान सहन करावे लागले. लांबलेल्या लढतीत ५० मिनिटांत अनुपमाने १४-२१, २१-१४, २२-२० असा विजय मिळविला.
नेपाळची आठवी मानांकित रसिला महार्जन, मलेशियाची दहावी मानांकित सिती झुलाईखा, भारताची अकरावी मानांकित देविका सिहाग, झिम्बाब्वेची १३वी मानांकित अविशी रैना आणि मलेशियाची १४वी मानांकित तान झिंग हुई या मानांकित खेळाडूंना पराभवाचा सामना करावा लागला. या सर्व खेळाडूंना बिगरमानांकित खेळाडूंनी पराभूत केले. आंकाक्षा मतेने रसिलाचा २१-१०, २१-१४, राधिका शर्माने सितीचा २११६, २१-१३, तन्वी शर्माने देविकाचा २१-१८, २२-२०, हिरल चौहानने अविशीचा २१-१८, २१-९, तर नेयसा करिअप्पाने तानचा २१-१२, २१-९ असा पराभव केला.
मिश्र दुहेरीत मलेशियाच्या ब्रायन जेरेमी गुंटिंग-ली शिन जीए जोडीने भारताच्या अव्वल मानांकित आयन रशिद-महेक नायक जोडीचा २१-८,-२१-७ असा २२ मिनिटांत पराभव केला. त्यानंतर भारताच्या बिगरमानांकित नाथन शिएह-श्रेया बालाजी यांनी दुसऱ्या मानांकित प्रिन्स दहल-रसिला महार्जन जोडीचे आव्हान २१-१३, २१-१६ असे संपुष्टात आणले.
दरम्यान, स्थानिक खेळाडू आणि सातवी मानांकित तारा शहा हिने मेथिनी विद्यासागर दीपा हिचा २१-१६, २१-१५ असा पराभव करून विजयी सुरवात केली.
निकाल – मुली, एकेरी
अनुपमा उपाध्याय (१) वि.वि. कर्णिका श्री सुरेश 14-21, 21-14, 22-20;
नेयसा करिअप्पा. ए वि.वि. टॅन झिंग हुई (१४)(मलेशिया) 21-12, 21-9;
आकांशा मॅटे वि.वि.रसिला महर्जन (८)(नेपाळ) 21-10, 21-14;
शीना नरवाल वि.वि. वेण्णाला कलागोटला 15-21, 21-18, 21-14;
श्रेष्टा रेड्डी कन्नारेड्डी (१५) वि.वि.क्यू-फरझा नाझरीन 21-13, 21-10;
इशारानी बरुआ (४) वि.वि. थालिता रामधानी विर्यावान (इंडोनेशिया) 21-13, 21-17;
सारुन्रक वितिदसर्न (९)(थायलंड) वि.वि.रिया हब्बू 21-12, 21-11;
ग्लोरिया व्ही आठवले वि.वि.गायत्री राणी जैस्वाल 21-7, 21-9;
आलिशा नाईक वि.वि.आफरीन बिश्नोई 21-9, 21-9;
राधिका शर्मा वि.वि.सीती जुलैखा (१०)(मलेशिया) 21-16, 21-13;
तन्वी शर्मा वि.वि.देविका सिहाग (11) 21-18, 22-20;
सीती नुरशुहैनी (६)(मलेशिया) वि.वि. श्रेया लेले 21-15, 21-16;
हिरल चौहान वि.वि.अविशी रैना (१३झिम्बाब्वे) 21-8, 21-9;
उन्नती हुडा (३) वि.वि.क्यू-ऐशा गांधी 21-12, 21-15;
अन्यापत फिचितप्रीचासक (१२)(थायलंड) वि.वि. रक्षिता श्री संतोष रामराज 21-16, 21-23, 21-19;
स्तुती अग्रवाल वि.वि.कौर महनूर 17-21, 21-12, 21-17;
तारा शाह (७)वि.वि.मेथिनी विद्यासागर दीपा 21-16, 21-15;
अजहरा मेलानी अरजिसेत्या (१६)(इंडोनेशिया) वि.वि.सृष्टी गुप्ता 21-10, 21-13;
चितवन खत्री वि.वि.प्रशांत बोनम 21-16, 20-22, 21-16.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
जेम्स अँडरसनने ट्विटरवर म्यूट केलेल्या शब्दांचा केला खुलासा, टीम इंडियाच्या ‘या’ खेळाडूचाही समावेश
केएल राहुलला अजून संधी दिल्याच पाहिजे! भारताच्या माजी कर्णधाराची मोठी प्रतिक्रिया
धवनसाठी मुलगी शोधा! नवीन व्हिडिओ व्हायरल, भारताचा सलामीवीर करणार का दुसरे लग्न?