मुंबई | ३०मे ते १४ जूलै २०१९ या काळात विश्वचषक इंग्लंड देशात होणार आहे. या विश्वचषकापुर्वी जगभरातील सर्वच माजी खेळाडूंनी रोजच नवनविन वक्तव्य करत एकप्रकारे वातावरण निर्मितीला सुरुवात केली आहे.
भारतासहित जगभरातील कोणतेच माजी क्रिकेटर यात मागे नाही. परंतु या सर्वात जर आघाडी कुणी घेतली असेल तर ते आहेत भारत, श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटर्स.
जयवर्धने पाठोपाठ श्रीलंकेचा महान फलंदाज कुमार संगकाराने विश्वचषक २०१९च्या चर्चेत उडी घेतली आहे.
अनुभवाला पर्याय नसतो आणि याच कारणामुळे एमएस धोनीचे भारतीय संघासोबत असणे अतिशय गरजेचे आहे, असे मत संगकाराने मांडले आहे.
धोनीच्या खराब कामगिरीमुळे गेले काही महिने त्याला जोरदार टीकेला सामोरे जावे लागले. असे असले तरी त्याने ऑस्ट्रेलिया तसेच न्यूझीलंडमध्ये चांगली कामगिरी करत टीकाकारांना चांगलेच उत्तर दिले आहे.
“जर आपला संघ विश्वचषकात खेळत असेल तर अनुभव खूपच महत्त्वाचा ठरतो. जेव्हा तुम्ही चांगली कामगिरीच्या जवळ असता तेव्हा गोष्ट वेगळीच असते. माझ्या मते धोनी २०१९ विश्वचषकात अंतिम १५ खेळाडूंमध्ये स्थान मिळविण्यात यशस्वी ठरेल. ” असे यावेळी संगकारा म्हणाला.
धोनी हा क्रिकेट जगतातील असा एकमेव कर्णधार आहे ज्याने आयसीसीचा टी२० विश्वचषक, ५० षटकांचा विश्वचषक आणि चॅंम्पियन्स ट्राॅफी जिंकली आहे.
२०१९चा आयसीसी विश्वचषक ३०मे ते १४ जूलै रोजी इंग्लंडमध्ये खेळवला जाणार आहे. यासाठी संघांमधील १५ खेळाडूंची अंतिम यादी पाठविण्याची तारिख २० एप्रिल आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
–गांगुली म्हणतो, हा खेळाडू विश्वचषकात टीम इंडियाचा सदस्य नसेल
–टीम इंडियाकडून विश्वचषकात सतत पराभूत होणारा पाकिस्तान यावेळी करणार हिशोब चुकता?
–या दिवशी होणार ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा
–संपुर्ण यादी- शिवछत्रपती पुरस्कारांची घोषणा, स्मृती मानधनासह या खेळाडूंना मिळणार पुरस्कार