भारत-बांगलादेश (India And Bangladesh) संघात 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळली गेली. या मालिकेत भारताने 2-0 ने वर्चस्व गाजवले. तत्पूर्वी श्रीलंकेचा माजी दिग्गज खेळाडू कुमार संगकाराने (Kumar Sangakkara) भारताच्या माजी क्रिकेटपटूला सर्वोत्तम टी20 फिनिशर्सपैकी एक म्हटले आहे.
कुमार संगकाराने (Kumar Sangakkara) माजी भारतीय यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकला (Dinesh Karthik) टी20 क्रिकेटमधील सर्वोत्तम फिनिशर म्हटले आहे. 39 वर्षीय दिनेश कार्तिकने (Dinesh Karthik) यावर्षी जूनच्या सुरुवातीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती.
एसए-20च्या आगामी हंगामासाठी खेळाडूंच्या लिलावानंतर कुमार संगकारा (Kumar Sangakkara) म्हणाला, “आम्हाला आमची पहिली पसंती मिळाली. आमच्याकडे फक्त काही जागा रिकाम्या होत्या. लिलाव, नेहमीप्रमाणे ग्रॅम स्मिथच्या नेतृत्वाखाली, खूप मनोरंजक होता. दिनेश कार्तिक डावाच्या शेवटी चमकदार कामगिरी करतो. तो विस्फोटक, सक्षम आणि जगभरातील टी20 क्रिकेटमधील सर्वोत्तम फिनिशर आहे.”
पुढे बोलताना संगकारा म्हणाला, “कार्तिकची उपस्थिती आणि अनुभव संघासाठी महत्त्वाचा आहे. सामान्यत: शीर्षस्थानी चमकदार कामगिरी करणाऱ्या जोसच्या जाण्यानंतर, आम्ही दोन वेगवेगळ्या खेळाडूंमध्ये जबाबदारी विभागण्यात यशस्वी झालो आहोत. जे तितकेच सक्षम आहेत. मला वाटते की आमच्याकडे गेल्या वेळेपेक्षा चांगले संतुलन आहे.”
भारताचा माजी खेळाडू दिनेश कार्तिकच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर त्याने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 26 कसोटी, 94 एकदिवसीय आणि 60 टी20 सामने खेळले आहेत. 26 कसोटी सामन्यात त्याने 25च्या सरासरीने 1,025 धावा केल्या आहेत. कसोटीमध्ये त्याने 7 अर्धशतकांसह 1 शतक झळकावले आहेे. 94 एकदिवसीय सामन्यात कार्तिकने 30.20च्या सरासरीने 1,752 धावा ठोकल्या आहेत. दरम्यान त्याने 9 अर्धशतके झळकावली आहेत, तर 60 टी20 सामन्यात त्याने 686 धावा केल्या.
महत्त्वाच्या बातम्या-
कसोटीमधील रिषभ पंतचे हे 5 मोठे विक्रम मोडणे जवळपास अशक्य
आत्महत्या की दुसरं काही? माजी क्रिकेटपटूच्या आईचा पुण्यात संशयास्पद मृत्यू
त्रिशतक झळकावणाऱ्या खेळाडूला मिळेल टीम इंडियात संधी? गोलंदाजीतही देतो योगदान






