महिला प्रीमियर लीग (WPL) २०२६ आता आपल्या अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात जायंट्स यांच्यात एलिमिनेटर सामना रंगणार आहे. गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर राहिल्यामुळे RCB ने थेट अंतिम फेरीत (Final) प्रवेश केला आहे. आता फायनलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूशी भिडण्यासाठी DC आणि GG यांच्यात जोरदार लढत होईल. हा एलिमिनेटर सामना वडोदरा येथील BCA स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. चला तर मग, DC आणि GG यांच्यातील हेड-टू-हेड रेकॉर्ड, प्लेइंग ११, संघ आणि लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माहितीवर एक नजर टाकूया.
दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात जायंट्स यांच्यात आतापर्यंत WPL मध्ये एकूण ८ सामने खेळले गेले आहेत. या दोन्ही संघांमध्ये नेहमीच अटीतटीची लढत पाहायला मिळाली आहे. यापैकी ४ सामन्यांत दिल्लीने विजय मिळवला आहे, तर ४ सामन्यांत गुजरात जायंट्सने बाजी मारली आहे. आगामी सामन्यामुळे आता या दोन्हीपैकी एक संघ विजयाच्या बाबतीत आघाडी घेईल.
WPL २०२६ मधील दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात जायंट्स यांच्यातील हा एलिमिनेटर सामना ३ फेब्रुवारी २०२६ रोजी होणार आहे. संध्याकाळी ७:०० वाजता दोन्ही संघांच्या कर्णधार टॉससाठी मैदानात येतील आणि ७:३० वाजता या महामुकाबल्याला सुरुवात होईल. चाहते हा सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनल्सवर थेट पाहू शकतात. याशिवाय, जियोहॉटस्टार (JioHotstar) वर देखील या सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग केले जाणार आहे.






