श्रीलंकेचा दिग्गज माजी कर्णधार कुमार संगकाराच्या नावावर वनडे क्रिकेटमध्ये सलग चार शतके करण्याचा खास विश्वविक्रम आहे. वनडेमध्ये सलग चार शतके करणारा तो सध्या एकमेव क्रिकेटपटू आहे. हा विश्वविक्रम संगकाराने 2015 च्या विश्वचषकात केला होता.
संगकाराने त्याचा हा खास विश्वविक्रम भारताचा कर्णधार विराट कोहली मोडू शकतो असा विश्वास व्यक्त केला आहे. इएसपीएन क्रिकइन्फोला दिलेल्या मुलाखतीत 25 प्रश्नांच्या सत्रात जेव्हा त्याला त्याचा हा विक्रम कोणता खेळाडू मोडू शकतो असे विचारले तेव्हा त्याने कोहलीचे नाव घेतले.
संगकारा म्हणाला, ‘काही खेळाडू आहेत. पण विराट कोहली या सगळ्यांपेक्षा सरस वाटतो.’
कोहली सध्या 2019 विश्वचषकात भारतीय संघाचे नेतृत्व करत असून त्याने आत्तापर्यंत या विश्वचषकात दोन अर्धशतकांसह 177 धावा केल्या आहेत. ही दोन अर्धशतके त्याने ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान विरुद्ध केली आहेत.
त्याचबरोबर कोहलीने पाकिस्तान विरुद्ध खेळताना वनडे क्रिकेटमध्ये 11 हजार धावांचा टप्पाही पार केला. तसेच कोहली वनडेमध्ये सर्वात जलद 11 हजार धावा करणाराही फलंदाज ठरला आहे.
कोहलीने याआधी वनडेमध्ये सलग तीन शतके केली आहेत. त्याने मागीलवर्षी ऑक्टोबरमध्ये विंडीज विरुद्ध खेळताना सलग तीन शतके केली होती.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–डेव्हिड वॉर्नर त्या खेळाडूला म्हणाला, ‘बिग मॅन, आय ऍम सॉरी’
–आयसीसीने सौम्य सरकारची केली ख्रिस्तियानो रोनाल्डोशी तुलना, चाहत्यांनी असे केले ट्रोल
–धवनच नाही तर हे खेळाडूही झाले आहेत विश्वचषक २०१९ मधून बाहेर