भारतीय संघ नवीन वर्षात आपल्या नव्या मोहिमेची सुरुवात श्रीलंकेविरुद्ध करताना दिसणार आहे. टी20 सामन्यांच्या या मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व हार्दिक पंड्या करताना दिसेल. वर्षभरापूर्वी भारतीय संघाचा भागही नसलेला हार्दिक आता पूर्णवेळ टी20 कर्णधार बनण्याच्या अगदी जवळ आहे. त्याने आपल्यातील नेतृत्व सिद्ध केल्याने जगभरातील माजी क्रिकेटपटू त्याचे कौतुक करताना दिसतात. आता यामध्ये श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संघकाराचे देखील नाव जोडले गेले आहे.
भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी20 मालिका 3 जानेवारीपासून सुरू होत आहे. हार्दिक तिसऱ्यांदा संघाचे नेतृत्व करताना दिसेल. तत्पूर्वी श्रीलंकेचा माजी कर्णधार व दिग्गज यष्टीरक्षक कुमार संगकाराने हार्दिकचे कौतुक केले. एका कार्यक्रमात बोलताना संगकारा म्हणाला,
“हार्दिक पंड्याचे नेतृत्व उत्कृष्ट आहे. आपण ते आयपीएलमध्ये पाहिलेले. आता त्याला राष्ट्रीय संघाचे कर्णधारपद सांभाळायचे आहे. नेता होण्याचे सर्व गुण त्याच्यात आहेत. नेता होण्यासाठी कर्णधार असणे आवश्यक नाही. त्याला खेळाची चांगली जाण असून तो चांगल्या पद्धतीने संघ चालवू शकतो. त्याच्यात नेतृत्वाच्या सर्व खुबी आहेत.”
हार्दिक याच्यासाठी हे वर्ष अत्यंत महत्त्वाचे ठरले आहे. यावर्षी प्रथमच त्याला आयपीएलमध्ये नेतृत्व केले होते. त्याच्या नेतृत्वात पहिल्यांदाच आयपीएलमध्ये सहभागी झालेल्या गुजरात टायटन्सने विजेतेपद पटकावले होते. त्यानंतर आयर्लंड दौऱ्यावर त्याला नेतृत्व करण्याची संधी मिळाली. तेथे तसेच न्युझीलँड दौऱ्यावर देखील त्याने संघाला विजयी केले. टी20 विश्वचषकात भारतीय संघाचा पराभव झाल्यानंतर टी20 क्रिकेटसाठी नवा कर्णधार निवडण्याची मागणी केली जात आहे. बीसीसीआयने त्याची तयारी सुरू केली असून, हार्दिक भारताचा नवा टी20 कर्णधार बनू शकतो.
(Kumar Sangakkara Praised Hardik Pandya Captaincy Skills)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विराट ते सेहवाग, ‘हे’ दिग्गज अपघातग्रस्त पंतसाठी चिंतेत; मोदीही म्हणाले, ‘या घटनेने मी…’
माणूस व्हा रे! रिषभच्या अपघातानंतर कार्तिकची लोकांना कळकळीची विनंती; म्हणाला…