वनडे विश्वचषक 2023 मध्ये चौथा सामना दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यांच्या दरम्यान खेळला जात आहे. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना 428 धावा उभारल्या. या धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेला पहिला धक्का लवकर बसला. मात्र, कुसल मेंडीस याने एका बाजूने दक्षिण आफ्रिकेवर आक्रमण करत केवळ 25 चेंडूंवर अर्धशतक झळकावले.
A 25 ball half century by Kusal Mendis. He's up to the task in the run chase – a clever knock! pic.twitter.com/PTxBBzeIGh
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 7, 2023
दक्षिण आफ्रिकेने 428 धावा उभारल्यानंतर पथुम निसंका व कुसल परेरा यांनी संघासाठी सुरुवात केली. निसंका खातेई न खोलता तंबूत परतला. मात्र, त्यानंतर मेंडीस याने एका बाजूने श्रीलंकेसाठी आक्रमण केले. त्याने या विश्वचषकातील सर्वात वेगवान अर्धशतक केवळ 25 चेंडूंमध्ये पूर्ण केले. यामध्ये तीन चौकार व सहा षटकारांचा समावेश होता.
मेंडीस या अर्धशतकानंतर देखील आपली आक्रमक फलंदाजी चालूच ठेवत होता. तो श्रीलंका संघाला या पाठलागामध्ये जिवंत ठेवलेला असतानाच कगिसो रबाडा याने त्याचा बळी मिळवला. बाद होण्यापूर्वी त्याने 42 चेंडूंमध्ये 76 धावांची खेळी केली. यामध्ये चार चौकार व आठ षटकारांचा समावेश होता.
(Kusal Mendis Hits Fastest 50 In ODI World Cup 2023 Against South Africa)
महत्वाच्या बातम्या –
हॅंगझूमध्ये भारतीय पथकाची ऐतिहासिक कामगिरी! तब्बल 107 पदकांसह चौथ्या स्थानी संपवले अभियान
कशी चाललीय टीम इंडियाची तयारी अन् शुबमनच्या फिटनेसचं काय? रोहित स्पष्टच बोलला…