---Advertisement---

बिग ब्रेकिंग! वनडे सिरीज तोंडावर असताना श्रीलंकेला दुहेरी धक्का, परेरासह ‘हा’ खेळाडूही संघाबाहेर

On: शुक्रवार, जुलै 16, 2021 12:25 PM
---Advertisement---

शिखर धवनच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे. उभय संघात १८ जुलैपासून ३ सामन्यांची वनडे मालिका आणि २५ जुलैपासून ३ सामन्यांची टी२० मालिका खेळली जाणार आहे. तत्पुर्वी श्रीलंका संघाच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहेत. वनडे मालिका अवघ्या दोन दिवसांवर असताना यजमान श्रीलंकेचा माजी कर्णधार आणि प्रमुख क्रिकेटपटू कुशल परेरा दुखापतीमुळे संपूर्ण दौऱ्यातून बाहेर झाला आहे. त्याच्याबरोबर अजून एक क्रिकेटपटू वनडे मालिकेला मुकणार आहे.

श्रीलंका क्रिकेटने शुक्रवारी (१६ जुलै) यांदर्भात माहिती दिली आहे. यष्टीरक्षक फलंदाज परेरा खांद्याला झालेल्या दुखापतीमुळे वनडे आणि टी२० मालिकेतून बाहेर पडला आहे. सरावादरम्यान त्याला ही दुखापत झाली होती. तर वेगवान गोलंदाज बिनुरा फर्नांडो हासुद्धा सुरुवातीच्या वनडे मालिकेतून बाहेर झाला आहे. त्याला गुरुवारी (१५ जुलै) सराव सत्रादरम्यान डाव्या पायाच्या घोट्याला दुखापत झाली होती. त्यामुळे तो वनडे मालिकेसाठी उपलब्ध राहू शकणार नाही.

https://twitter.com/ICC/status/1415923815834607618?s=20

अशात श्रीलंका संघापुढे संघ निवडीसाठी मोठा पेच निर्माण झाला आहे. नुकत्याच इंग्लंड दौऱ्यातील निराशाजनक कामगिरीनंतर श्रीलंका संघ व्यवस्थापनाने परेराची नेतृत्त्वपदावरुन हकालपट्टी करत दसुन शनाकाला ही जबाबदारी देण्याचे ठरवले आहे. त्यामुळे एका अर्थाने त्यांचा कर्णधाराचा प्रश्न मिटला आहे. परंतु परेरा हा मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये श्रीलंकेचा मुख्य सलामी फलंदाज आहे. त्यामुळे त्याच्या संघाबाहेर होण्याने संघापुढे सलामी फलंदाजांचा प्रश्न उभा राहिला आहे. सोबतच फर्नांडोचा पर्यायी खेळाडू शोधण्याचे आव्हानही त्यांच्यापुढे असेल.

अद्याप श्रीलंका बोर्डाने त्यांचा संघ निवडला नसून आता कोणत्या खेळाडूंना संघात जागा मिळेल? हे पाहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

आयसोलेशनमधील भारतीय खेळाडूंबाबत महत्त्वाची अपडेट, कोरोना टेस्टचा अहवाल आला पुढे

कोरोना पॉझिटिव्ह रिषभवर टीकेची झोड, बीसीसीआय अध्यक्षाचा बचावासाठी पुढाकार; दिली ‘अशी’ प्रतिक्रिया

सराव सामन्यात राहुल घेणार पंतची जागा, पहिल्या कसोटीतूनही अव्वल यष्टीरक्षकाला करू शकतो आऊट

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---