प्रतिष्ठित अशा इंडियन प्रीमियर लीग २०२०चे आतापर्यंत साखळी फेरीतील एकूण ४३ सामने झाले आहेत. तर केवळ १३ सामने उरले आहेत. त्यामुळे हे उर्वरित सामने कोणत्या युद्धापेक्षा कमी असणार नाहीत. कारण प्रत्येक सामन्याचा निकाल विजेता संघाच्या प्लेऑफमध्ये प्रवेश करण्याच्या आशा जागा करणार आहे.
एमएस धोनीच्या नेतृत्त्वाखालील चेन्नई सुपर किंग्स संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. तर दूसऱ्या बाजूला, सध्या गुणतालिकेत टॉप-३ मध्ये असणाऱ्या संघांचे आयपीएलच्या दूसऱ्या टप्प्यात जाणे निश्चित आहे. पण उर्वरित ४ संघांमध्ये चौथ्या स्थानासाठी काट्याची टक्कर होणार आहे.
या ३ संघांचे स्थान पक्के
मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर हे तिन्ही संघ सध्या गुणतालिकेत टॉप-३ स्थानांवर आहेत. या तिन्ही संघांनी आतापर्यंत एकूण ७ सामने जिंकले असून, त्यांच्या खात्यात १४ गुणांची नोंद आहे. मुंबई संघ सर्वाधिक १.४४८ नेट रन रेटसह अव्वल स्थानावर विराजमान आहे. तर दिल्ली ०.४३४ नेट रन रेटसह दूसऱ्या आणि बेंगलोर ०.१८२ नेट रन रेटसह तिसऱ्या स्थानावर आहे.
आता दिल्लीचे केवळ ३ तर मुंबई आणि बेंगलोरचे प्रत्येकी ४ सामने बाकी आहेत. त्यामुळे या तिन्ही संघांचे प्लेऑफमध्ये प्रवेश करणे निश्चित आहे.
कोलकातापुढे मोठे आव्हान
शनिवारी (२४ ऑक्टोबर) दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध झालेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने ५९ धावांची विजय मिळवला होता. त्यामुळे त्यांच्या प्लेऑफच्या आशा अजून जास्त मजबूत झाल्या आहेत. कोलकाता संघाने अद्याप ११ सामने खेळले असून त्यातील ६ सामने जिंकले आहेत. तर ५ सामन्यात त्यांना पराभवाला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे १२ गुणांसह आणि -०.४७६ नेट रन रेटसह हा संघ गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे.
उर्वरित सामने- किंग्स इलेव्हन पंजाब, चेन्नई सुपर किंग्स, राजस्थान रॉयल्स
पंजाबपुढे मोठे आव्हान
अनिल कुंबळेच्या प्रशिक्षणाखाली किंग्स इलेव्हन पंजाब संघ यावर्षी कमालीचे प्रदर्शन करत आहे. त्यांनी एकूण ११ सामने खेळले असून त्यातील ५ सामन्यात विजयाची पताका झळकावली आहे. त्यामुळे त्यांनी १० गुणांसह गुणतालिकेत ५वे स्थान पटकावले आहे. पण कोलकाता संघ अजूनही त्यांच्या एक पाऊल पुढे आहे. त्यामुळे त्यांना अंतिम ४ संघात सहभागी होण्यासाठी उर्वरित तिनही सामने जिंकावे लागणार आहेत.
उर्वरित सामने- कोलकाता नाईट रायडर्स, राजस्थान रॉयल्स, चेन्नई सुपर किंग्स
हैदराबादला अजूनही आहेत अपेक्षा
डेविड वॉर्नरच्या नेतृत्त्वाखालील सनरायझर्स हैदराबाद संघ शनिवारी (२४ ऑक्टोबर) पंजाबविरुद्ध झालेल्या सामन्यात १२ धावांनी पराभूत झाला होता. त्यामुळे आतापर्यंत खेळलेल्या ११ सामन्यांपैकी ४ सामने जिंकत आणि ७ सामने गमावत हैदराबाद संघ गुणतालिकेत ६व्या स्थानावर आहे. त्यामुळे उरलेले तीन सामने त्यांच्यासाठी करा अथवा मराच्या लढाईसारखे आहेत.
उर्वरित सामने- मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
राजस्थानला करावे लागणार खूप परिश्रम
हंगामातील पहिल्याच सामन्यात चेन्नई सुपर किंग्सला पराभूत करत राजस्थान रॉयल्सने दणक्यात हंगामाची सुरुवात केली होती. पण पुढे त्यांची गाडी डगमगली आणि आता संघ गुणतालिकेत ७व्या स्थानावर आला आहे. त्यांनी अद्याप एकूण ११ सामने खेळले असून ४ सामने जिंकले आहेत, तर ७ गमावले आहेत. त्यामुळे त्यांचे आणि हैदराबाद संघाचे गुण (८) सारखेच आहेत. पण राजस्थानचा नेट रन रेट (-०.६२०) हैरदाबादपेक्षा (०.०२९) कमी असल्यामुळे ते शेवटून दूसऱ्या स्थानावर आले आहेत.
उर्वरित सामने- मुंबई इंडियन्स, किंग्स इलेव्हन पंजाब, कोलकाता नाईट रायडर्स
महत्त्वाच्या बातम्या-
दिल्लीच्या फलंदाजांना लोळवणारा मिस्ट्री स्पिनर तुम्हाला माहित आहे का? पहिल्यांदाच घेतल्यात ५ विकेट्स
करामती खान! राशिदच्या न उमगणाऱ्या फिरकीवर केएल राहुलची दांडी गुल, पाहा व्हिडिओ
ट्रेंडिंग लेख-
कोण होत्या ‘त्या’ ६ मिस्ट्री गर्ल, ज्यांना आयपीएलदरम्यान काही तासातच मिळाली प्रसिद्धी
वॉटसनसह ‘या’ ३ दिग्गजांना पुढच्या हंगामात मिळणार डच्चू?
अतिशय गरीबीतुन पुढे आलेले ५ भारतीय क्रिकेटपटू, आज आहेत करोडपती