आयपीएलमध्ये ऑरेंज कॅप हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूला दिली जाते. तर पर्पल कॅप हंगामात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजाला दिली जाते.
आयपीएल २०२० चा ३१ वा सामना गुरुवारी (१५ ऑक्टोबर) शारजाह येथे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब संघात झाला. हा सामना पंजाब संघाने ८ विकेट्सने जिंकला. या हंगामातील हा पंजाबचा दुसराच विजय होता.
आत्तापर्यंत आयपीएलमध्ये ३१ सामने झाले आहेत. ३१ सामन्यांनंतर ऑरेंज कॅप किंग्स इलेव्हन पंजाबचा कर्णधार केएल राहुलकडे कायम आहे. तर पर्पल कॅप दिल्ली कॅपिटल्सचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाकडे कायम आहे. केएल राहुल व दुसऱ्या स्थानावरील मयंक अगरवाल यांच्यात केवळ ६६ धावांचा फरक आहे. विकेट्समध्ये मात्र रबाडानंतर ७ विकेट्सच्या फरकाने युझवेंद्र चहल चौथ्या स्थानावर आहे.
#३१व्या सामन्यानंतर ऑरेंज कॅपच्या शर्यतीत असणारे ५ फलंदाज (आयपीएल २०२० मध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज)-
१. केएल राहुल- ४४८ धावा, ८ सामने (किंग्स इलेव्हन पंजाब)
२. मयंक अगरवाल – ३८२ धावा, ८ सामने (किंग्स इलेव्हन पंजाब)
३. फाफ डु प्लेसिस – ३०७ धावा, ८ सामने (चेन्नई सुपर किंग्स)
४. विराट कोहली- ३०४ धावा, ८ सामने (रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर)
५. श्रेयस अय्यर- २९८ धावा, ८ सामने (दिल्ली कॅपिटल्स)
#३१ व्या सामन्यानंतर पर्पल कॅपच्या शर्यतीत असणारे ५ गोलंदाज (आयपीएल २०२० मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज)-
१. कागिसो रबाडा – १८ विकेट्स, ८ सामने (दिल्ली कॅपिटल्स)
२. जोफ्रा आर्चर- १२ विकेट्स, ८ सामने (राजस्थान रॉयल्स)
३. मोहम्मद शमी – १२ विकेट्स, ८ सामने (किंग्स इलेव्हन पंजाब)
४. युझवेंद्र चहल- ११ विकेट्स, ८ सामने (रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर)
५. जसप्रीत बुमराह – ११ विकेट्स, ७ सामने (मुंबई इंडियन्स)