आयपीएलमध्ये शनिवारी (10 ऑक्टोबर) दोन सामने खेळले जातील. लीगचा 24 वा सामना अबू धाबी येथे किंग्स इलेव्हन पंजाब आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात दुपारी 3.30 वाजता खेळला जाईल. त्याचबरोबर 25 वा सामना चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात दुबईमध्ये रात्री 7.30 वाजता खेळला जाईल.
पंजाबसमोर असेल मोठे आव्हान
हंगामात 6 पैकी 5 सामने गमावल्यानंतर पंजाबला कोलकाता विरुद्ध जिंकण्याचे मोठे आव्हान असेल. त्याचबरोबर चेन्नईविरुद्ध मागील सामना जिंकल्यानंतर कोलकाता संघात आत्मविश्वास वाढला असेल. गुणतालिकेत केकेआर चौथ्या आणि पंजाब आठव्या स्थानावर आहे.
चेन्नईसाठी विजय आहे आवश्यक
रात्री सीएसके आणि बेंगलोर हे दोन संघ आमनेसामने येतील. बेंगलोरने आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे, परंतु सीएसकेविरुद्ध या संघाची कामगिरी चांगली राहिलेली नाही. त्याचबरोबर या हंगामात चेन्नईने 6 पैकी 4 सामने गमावले आहेत. अशा परिस्थितीत सीएसकेसाठी हंगामातील प्रत्येक सामन्यात विजय मिळवणे आवश्यक आहे. गुणतालिकेत आरसीबी पाचव्या आणि सीएसके सहाव्या क्रमांकावर आहे.
पंजाब-कोलकाता मधील सर्वाधिक महागडे खेळाडू
कोलकाताचा सर्वात महागडा खेळाडू म्हणजे वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स. प्रत्येक हंगामासाठी त्याला 15.50 कोटी रुपये मिळतात. यानंतर फिरकीपटू सुनील नरेनचा क्रमांक येतो प्रत्येक हंगामात त्याला 12.50 कोटी मिळतात. सलामीवीर कर्णधार केएल राहुल पंजाबमधील सर्वात महागडा खेळाडू आहे त्याला हंगामात 11 कोटी मिळतात आणि फिरकीपटू ग्लेन मॅक्सवेलला 10.75 कोटी मिळतात.
चेन्नई-बेंगलोर मधील सर्वात महागडे खेळाडू
चेन्नईचा कर्णधार एमएस धोनी हा सीएसकेचा सर्वात महागडा खेळाडू आहे. त्याला हंगामात 15 कोटी रुपये मिळतात. त्यांच्यापाठोपाठ केदार जाधव असून, त्याला हंगामात 7.80 कोटी रुपये मिळतात. कर्णधार कोहली हा आरसीबीमधील सर्वात महागडा खेळाडू आहे. त्याला हंगामातील 17 कोटी रुपये मिळतात. त्याच्यापाठोपाठ स्टार फलंदाज एबी डिविलियर्सला हंगामात 11 कोटी रुपये मिळतात.
हवामान अहवाल आणि खेळपट्टीबद्दल माहिती
दुबई आणि अबुधाबीमध्ये आकाश स्वच्छ होईल. दुबईमध्ये तापमान 24 ते 39 डिग्री सेल्सिअस असण्याची शक्यता आहे; आणि अबू धाबीमध्ये तापमान 28 ते 36 डिग्री सेल्सिअस असेल. दोन्ही खेळपट्ट्या फलंदाजांसाठी उपयुक्त असेल. खेळपट्ट्या संथ गतीच्या असल्याने फिरकीपटूना मदत होण्याची शक्यता आहे. दुबईमध्ये नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम फलंदाजीला प्राधान्य देईल आणि अबुधाबीमध्ये नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजीला प्राधान्य देईल.
दोन्ही मैदानावरील विजय मिळवण्याचा दर
दुबईमध्ये आयपीएलपूर्वी खेळल्या गेलेल्या 61 टी20 सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाचा विजय मिळवण्याचा दर 55.74% आहे. त्याचबरोबर अबूधाबीमधील शेवटच्या 44 टी -20 सामन्यात प्रथम गोलंदाजी करणाऱ्या संघाचा विजय मिळवण्याचा दर 56.81% आहे.
दुबईच्या मैदानाबद्दल माहिती
या मैदानावर खेळले गेलेले एकूण टी 20 सामने : 61
प्रथम फलंदाजी करताना मिळालेले विजय : 34
प्रथम गोलंदाजी करताना मिळालेले विजय : 26
पहिल्या डावात सरासरी धावसंख्या : 144
दुसर्या डावात सरासरी धावसंख्या : 122
अबू धाबीच्या मैदानाबद्दल माहिती
या मैदानावर खेळले गेलेले एकूण टी 20 सामने : 44
प्रथम फलंदाजी करताना मिळालेले विजय : 19
प्रथम गोलंदाजी करताना मिळालेले विजय : 25
पहिल्या डावात सरासरी धावसंख्या : 137
दुसर्या डावात सरासरी धावसंख्या : 128
कोलकाताने 2 वेळा जिंकला किताब
कोलकाताने आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत दोनदा ( 2014, 2012) अंतिम सामना खेळला आहे आणि दोन्ही वेळा चॅम्पियन बनला आहे. त्याचबरोबर पंजाबने एकदाही जेतेपद जिंकले नाही. 2014 मध्ये या संघाने अंतिम फेरी गाठली होती, परंतु कोलकाताकडून या संघाला पराभव पत्करावा लागला.
चेन्नईने 3 वेळा जिंकला किताब
कर्णधार एमएस धोनीच्या नेतृत्वात चेन्नईने 2010 आणि 2011 मध्ये सलग दोनदा जेतेपद जिंकले. तसेच चेन्नई 2018 मध्ये देखील चॅम्पियन बनला होता. त्याचवेळी आरसीबीने 2009 मध्ये भारताचा माजी क्रिकेटपटू अनिल कुंबळे आणि 2011 मध्ये न्यूझीलंडचा माजी क्रिकेटपटू डॅनियल व्हिटोरी यांच्या नेतृत्वात अंतिम सामना खेळला होता. 2016 मध्ये विराटच्या नेतृत्वाखालीही या संघाने अंतिम फेरी गाठली होती. पण तिन्हीवेळेस विजय मिळवण्यात त्यांना अपयश आले.
आयपीएलमध्ये कोलकाताचा विजय मिळवण्याचा दर आहे पंजाबपेक्षा अधिक
आयपीएलमध्ये कोलकाताचा विजय मिळवण्याचा दर 52.73% आहे. केकेआरने आतापर्यंत एकूण 183 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने 95 सामने जिंकले आहेत आणि 88 गमावले आहेत. त्याचवेळी, पंजाबचा विजय मिळवण्याचा दर 45.32% आहे. पंजाबने आतापर्यंत एकूण 182 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये 83 सामने जिंकले आहेत आणि 99 गमावले आहेत.
आयपीएलमध्ये चेन्नईचा विजय मिळवण्याचा दर आहे सर्वाधिक
आयपीएलमध्ये चेन्नईचा विजय मिळवण्याचा दर 60.29% आहे. सीएसकेने आतापर्यंत एकूण 171 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये 102 सामने जिंकले आहेत आणि 68 सामने गमावले आहेत. एक सामना अनिर्णित होता. बेंगलोरचा विजय मिळवण्याचा दर 47.52% आहे. आरसीबीने आतापर्यंत एकूण 186 सामने खेळले आहेत त्यामध्ये 87 सामने जिंकले आणि 95 सामने गमावले आहेत. 4 सामने अनिर्णीत होते.





