---Advertisement---

व्वा रे भावा! केवळ ६ कसोटीत तिसऱ्यांदा घेतल्या डावात ५ विकेट्स

---Advertisement---

ख्राईस्टचर्च। न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान संघात रविवारपासून(३ जानेवारी) २ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना हॅग्ली ओव्हल स्टेडियमवर सुरु झाला आहे. या सामन्याच्या पहिल्याच दिवशी न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करणाऱ्या पाकिस्तानचा पहिला डाव २९७ धावांवर संपवला आहे. यामध्ये न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज काईल जेमिसनने मोलाचा वाटा उचलला.

जेमिसनने घेतल्या ५ विकेट्स –

या सामन्यातील पहिल्या डावात जेमिसनने अचूक मारा करताना २१ षटकात ६९ धावा दिल्या. तसेच ५ विकेट्स घेण्याची कामगिरीही केली. त्याने यावेळी ८ षटके निर्धावही टाकली. त्याने पाकिस्तानच्या अबीद अली, हॅरिस सोहेल, फहिम अश्रफ, कर्णधार मोहम्मद रिझवान आणि फवाद आलम यांना बाद केले.

कारकिर्दीत ६ कसोटीत तिसऱ्यांदा ५ विकेट्स –

तब्बल ६ फुट ८ इंच एवढी उंची असलेल्या जेमिसनने सन २०२० मध्ये फेब्रुवारी महिन्यात वेलिंग्टन येथे भारताविरुद्ध कसोटी पदार्पण केले होते. त्याने भारताविरुद्ध पदार्पणाच्या कसोटी मालिकेतच प्रभावी कामगिरी केली होती. त्याने भारताविरुद्ध ख्राईस्टचर्च येथेच खेळताना कसोटी कारकिर्दीत पहिल्यांदाच एका डावात ५ विकेट्स घेण्याची कामगिरी केली होती. विशेष म्हणजे तो त्याचा दुसराच कसोटी सामना होता.

त्यानंतर त्याने कारकिर्दीतील चौथा कसोटी सामना खेळताना वेस्ट इंडिजविरुद्ध वेलिंग्टन येथे सामन्यात ७ विकेट्स घेतल्या होत्या. त्यातील ५ विकेट्स त्याने वेस्ट इंडिजच्या पहिल्या डावात घेतल्या होत्या. त्यानंतर आता त्याने पाकिस्ताविरुद्ध कारकिर्दीतील सहावा सामना खेळताना पुन्हा एकदा डावात ५ विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे.

जेमिसन हा २६ वर्षीय अष्टपैलू खेळाडू असून त्याने कसोटीव्यतिरिक्त न्यूझीलंडचे वनडे आणि टी२० सामन्यांमध्येही प्रतिनिधित्व केले आहे. त्याने २ वनडे आणि ४ टी२० सामने खेळले असून वनडेत ३ आणि टी२०मध्ये ३ विकेट्स घेतल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

…म्हणून सिडनी येथे होणारा कसोटी सामना ‘पिंक टेस्ट’ नावाने ओळखला जातो

केंद्रीय वित्त मंत्रालयाने टॅक्समध्ये सूट दिली नाही, तर बीसीसीआयला भरावे लागणार तब्बल ‘इतके’ कोटी

फलंदाजाने मारलेला चेंडू पडला थेट चाहत्यांच्या बियर ग्लासमध्ये, बघा विनोदी व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---