---Advertisement---

एकमेकींची केसं ओढली, दुसऱ्या सामन्याचं तिकिट मिळवण्यासाठी महिलांची तुंबळ हाणामारी, Video तुफान Viral

On: शुक्रवार, जून 10, 2022 1:33 PM
Cuttuk-Ticket-Selling
---Advertisement---

सध्या भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन संघांमध्ये ५ टी२० सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना ९ जून रोजी दिल्लीतील अरुण जेठली स्टेडियम येथे पार पडला. या सामन्यांत दक्षिण आफ्रिका संघाने भारतावर ७ गडी राखत मात केली. आता या मालिकेतील दुसरा सामना ओडिशातील कटक येथील बाराबती स्टेडियमवर खेळला जाणार आहे. मात्र, या सामन्याच्या तिकिट खरेदीवेळी महिलांमध्ये तुफान राडा झाल्याची घटना समोर आली आहे. 

दुसऱ्या सामन्यापूर्वी कटकमध्ये तिकीट विक्रीदरम्यान गोंधळ उडाला होता आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना सौम्य बळाचा वापर करावा लागला होता. मिळालेल्या माहितीनुसार, काही महिला रांगेच्या पुढे आल्या आणि त्यानंतर जमावाने गोंधळ घातला आणि पोलिसांना लाठीमार करावा लागला. या वेळी महिलांमध्ये झालेल्या हाणामारीचा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे.

अतिरिक्त जिल्हा पोलीस आयुक्त प्रमोद रथ याबाबत स्पष्टीकरण देताना म्हणाले की, “सुमारे ४० हजार लोक तिकिट खरेदीसाठी उपस्थित होते तर १२ हजार तिकिटांची विक्री सुरू होती. यावेळी खरेदीसाठी आलेल्या नागरिकांमध्ये गोंधळ उडाला. त्यावेळी तिकीट विक्रीची प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी पोलिसांना यावेळी सौम्य बळाचा वापर करावा लागला.”

दरम्यान, भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या टी२० सामन्यात भारताला पराभव पत्कारावा लागला. या सामन्यांत भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करत २११ धावा केल्या. या मध्ये इशान किशनने सर्वाधिक ७६ धावा केल्या. याशिवाय कर्णधार रिषभ पंत आणि अपकर्णधार हार्दिक पंड्या यांनी तुफानी खेळी करत डावाचा शेवट गोड केला. मात्र, गोलंदाजांना हे २१२ धावांचे लक्ष्य रोखण्यास अपयश आले आणि दक्षिण आफ्रिकेने हा सामना ७ गडी राखत खिशात घातला.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

मिलरची भारताविरुद्ध ‘किलर’ खेळी, सामनावीर बनत ‘मिस्टर ३६० डिग्री’चा मोठा विक्रम काढला मोडित

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतून बाहेर पडल्यानंतर कुलदीप भावुक, चहलने केले सांत्वन

उमरान मलिकला संघात न घेतल्याने फॅन भडकले टीम इंडियावर; प्रतिक्रीयांचा झाला भडिमार

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---