टी२० विश्वचषकातील सुपर १२ च्या ‘गट अ’ मध्ये, बांगलादेश आणि श्रीलंका संघ शारजाच्या मैदानावर रविवारी आमने-सामने आले होते. या सामन्यात श्रीलंकेने बांगलादेशविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. पण या सामन्यादरम्यान मैदानावर श्रीलंकेचे वेगवान गोलंदाज लाहिरू कुमारा आणि लिटन दास यांच्यात जोरदार बाचाबाची झाल्याचे दिसून आले. दोघांमधील वाढता वाद पाहून सहकारी खेळाडू बचावासाठी आले. त्यांच्या या वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
सामन्यादरम्यान, लिटन दासला श्रीलंकेचा गोलंदाज लाहिरु कुमारा याने बाद केले, पण त्यानंतर जे घडले ते क्रिकेट चाहत्यांना आणि क्रिकेट पंडितांनाही त्याचे नवल वाटले. लिटन दासने गोलंदाज लाहिरूच्या चेंडूवर जोरदार शॉट मारण्याचा प्रयत्न केला, पण शनाकाने त्याचा झेल घेत त्याला बाद केले.
परंतु, यानंतर, जेव्हा लिटन पॅव्हेलियनमध्ये जात होता, तेव्हा गोलंदाज लाहिरू कुमारा आणि त्याच्यात वाद झाला. वाद इतका तीव्र होता की बांगलादेशच्या फलंदाजाने आपली बॅटही त्याच्याकडे उगारली. जेव्हा दोघांमधील वाद अधिक तीव्र झाला तेव्हा इतर खेळाडूंनी त्यांना दूर केले. परंतु दोन्ही खेळाडू एकमेकांना शिवीगाळ करताना दिसले. अंपायरनेही यात मध्यस्थी करत दोघांना वेगळे केले.
https://twitter.com/haidilyemeraa/status/1452223069049733123
https://twitter.com/pant_fc/status/1452228483690770432
दरम्यान, माजी विश्वविजेता श्रीलंका संघाची टी-20 विश्वचषकात चांगली कामगिरी सुरूच आहे. संघाने सुपर-१२ मधील पहिल्या सामन्यात बांगलादेशचा ५ विकेट्सने पराभव केला. सामन्यात प्रथम खेळताना बांगलादेशने ४ गडी गमावत १७१ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात श्रीलंकेने १८.५ षटकांत ५ गडी राखून लक्ष्य गाठले. चरित अस्लंका ८० धावांवर नाबाद राहिला. भानुका राजपक्षेनेही ५३ धावा केल्या.
श्रीलंकेचा या स्पर्धेतील हा सलग चौथा विजय आहे. यापूर्वी या संघाने पात्रता फेरीतील तीनही सामने जिंकले होते. श्रीलंकेने २०१४ मध्ये टी -२० विश्वचषक जिंकला. टी२० विश्वचषकातील बांगलादेशवर श्रीलंकेचा हा दुसरा विजय आहे. याआधी २००७ मध्ये संघाने बांगलादेशचा ६४ धावांनी पराभव केला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
बुमराहला भारताचा सर्वात यशस्वी टी२० गोलंदाज बनण्याची संधी, फक्त करावे लागेल ‘हे’ काम
भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी चाहत्यांमध्ये रंगला ‘मीम्स वॉर’; ‘मौका-मौका’ सोशल मीडियावर ट्रेंड