पुणे। टोकियो येथे 2020 मध्ये होणाऱ्या ऑलंपिक क्रीडा स्पर्धेसाठी पूर्व तयारी मोहिमेला पुण्यातील “लक्ष्य” या ना नफा तत्त्वावरील स्वयंसेवी क्रिडा संस्थेने आज प्रारंभ केला. “लक्ष्य”च्या नवव्या वर्धपान दिनानिमित्त आयोजित समारंभात ओलंपिक 2020 मोहीम सुरु झाल्याची घोषणा करण्यात आली.
या प्रसंगी लक्ष्य ऍथलीट् आशियायी मुष्ठियुध्द विजेती पुजा राणी, सिमरणजीत कौर, बुध्दिबळपटू ग्रॅंड मास्टर विदित गुजराथी, कुस्तीपटू सिमरण कौर यांच्यासह लक्ष्यचे सदस्य विशाल चोरडीया, सुंदर अय्यर, अभिजीत कुंटे, आशिष देसाई, स्वस्तिक सिरसीकर, भरत शहा, मनिष मेहता, आणि रितू नथानी आदी मान्यवर उपस्थित होते.
पत्रकारपरिषदेत अधिक माहिती देताना “लक्ष्य”चे अध्यक्ष विशाल चोरडिया यांनी सांगितले की, आम्ही सध्या पाठिंबा देत असलेल्या 9 क्रिडा प्रकारांमधील 37 ऍथलीट् पैकी 7 ऍथलीटची निवड पुढील वर्षी टोकियो येथे होणाऱ्या ऑलंपिक 2020 स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी आम्ही केली आहे.
चोरडिया पूढे म्हणाले की, आम्ही आमच्या ऍथलीट्ना अधिकाधिक सुविधा देण्याचा प्रयत्न करतानाच आम्ही देत असलेल्या पाठिंब्याचा दर्जा उंचावण्याचा अधिक अर्थपूर्ण आणि सखोल माध्यमातून प्रयत्न करीत आहोत. पुढच्या संपूर्ण वर्षभरात तसेच, टोकियो 2020 स्पर्धा संपेपर्यंत आमचे अधिकाधिक ऍथलीट् ऑलंपिकसाठी पात्र ठरावेत यासाठी त्यांना सर्वोतोपरी पाठिंबा देण्याचे लक्ष आम्ही ठेवले आहे.
टोकियो 2020 ऑलंपिकसाठी पात्र ठरू शकणाऱ्या ज्या अशा स्थानांकडे आमचे लक्ष आहे. त्यामध्ये साजन भानवाल(20,कुस्ती) व रेश्मा माने(20,कुस्ती), सचिन सिवाच(19), सिमरनजीत कौर(23), नमन तवर(20)(सर्व मुष्टियोध्ये),साक्षी शितोळे(18,तिरंदाजी) व मानिका बात्रा(21,टेबल टेनिस) या खेळाडूंचा समावेश आहे.
यावेळी “लक्ष्य”चे सचिव सुंदर अय्यर म्हणाले कि, देशभरातली उदयोन्मुख व गुणवान खेळाडू आणि प्रत्यक्ष कामगिरी करू शकणारे खेळाडू यातील दरी सांधण्याचा आमचा प्रयत्न आहे. विविध क्रीडा प्रकारातील गुणवान खेळाडू निवडून त्यांना पाठिंबा देण्याची मोहीम “लक्ष्य”ने 2010 मध्ये सुरु केली होती. त्यानंतरच्या कालावधीत “लक्ष्य”ने 9 विविध क्रीडा प्रकारातील 100 हुन अधिक क्रीडापटूंना पाठिंबा देण्यापर्यंत मजल मारली आहे. भारताचे प्रतिनिधित्व करताना ऑलंपिक स्पर्धेत चमकदार कामगिरी करण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी विविध गुणवान खेळाडूंची निवड करून तसेच, योग्य ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी सर्व प्रकारची तांत्रिक व आर्थिक मदत उभी करण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत.
गेल्या दोन ऑलंपिक स्पर्धांपैकी लंडन येथील 2012 ओलंपिकमध्ये “लक्ष्य”ने पाठिंबा दिलेल्या राही सरनोबत, ज्वाला गट्टा, आश्विनी पोनप्पा, व्ही. दिजु आणि जय भगवान या 5 ऑलंपिकपटूंचा समावेश होता. तर, रिओ येथे झालेल्या 2016 ऑलंपिक स्पर्धेत “लक्ष्य”ने पाठिंबा दिलेल्या सुमित रेड्डी, मनू अत्री, प्रार्थना ठोंबरे, मनिका बात्रा, शरथ कमल, सौम्यजीत घोष आणि रविंदर खत्री या 7 खेळाडूंनी भारताचे प्रतिनिधित्व करण्याचा मान मिळविला होता.
खेळाडूंना प्रायोजकत्व देणा-या सोनी पिक्टर्स अँड नेटवर्क, बुक अ स्माईल, भारत फोर्ज, ग्रुप चेवियत, सह्याद्री इंडस्ट्रीज्, ट्यारिएरो, शांतीकुमार फिरोदीया मेमोरीयल फाउंडेशन, शर्मिला दालमीया, कांतिलाल लुंकड फाउंडेशन, प्रविण मसालेवाले, कुमार प्रॉपर्टीज्, सायबेज, जीआयसी, सुजनील, नांदेड सिटी, रावेतकर, संचेती हॉस्पिटल आणि इकोलाईट्स या सर्वांचे आम्ही आभार मानतो, यांच्यामुळे भारतातील विविध राज्यातील 37 खेळाजडूंना मदत मिळाली आहे. देशाचे खाळातील भविष्य उज्वल होण्यास मदत मिळत आहे.” असे अय्यर यांनी नमुद केले.
लक्ष्यच्या व्यवस्थापकीय समितीच्या सदस्य रितू नथानी म्हणाल्या की, आगामी खेळाडूंची आम्ही निवड केली असून यामध्ये 32 खेळाडूंपैकी 18 महिला ऍथलीट्स आहेत आणि आम्ही त्यांना पाठिंबा देत असल्याचा आम्हाला अभिमान आहे. या महिला ऍथलीट्स आपल्या देशाचे व कुटुंबीयांचे नाव उज्वल करतील असा आम्हाला विश्वास वाटतो.
लक्ष्यचा पाठिंबा लाभलेल्या खेळाडूंची यादी
ग्रँड मास्टर विदित गुजराथी(बुध्दिबळ, प्रायोजक- बीएफएल); आदित्य मित्तल(बुध्दिबळ, प्रायोजक- सोनी); अक्षय कुमार( मुष्टियुध्द 60 किलो, प्रायोजक- बुक अ स्माईल); अंजु दुहान(कुस्ती 49 किलो, प्रायोजक- फिरोदीया); आयुषी पोद्दार(नेमबाजी 10मि रायफल, प्रायोजक- सोनी); भाग्यश्री कोलते( तिरंदाजी , प्रायोजक- सोनी); महक जैन(टेनिस, प्रायोजक- चेवियट);मल्लिका मराठे(टेनिस, प्रायोजक- सोनी); मनिष सिंग(मुष्टियुध्द , प्रायोजक- बुक अ स्माईल); नमन तन्वर( मुष्टियुध्द 91 किलो, प्रायोजक- ट्यारिएरो); नताशा डुमने( तिरंदाजी , प्रायोजक- बुक अ स्माईल); नीरज फोगट( मुष्टियुध्द 57 किलो, प्रायोजक- सोनी); निशा मलिक(कुस्ती, प्रायोजक- बुक अ स्माईल);नुपुर हगवणे( नेमबाजी 10 मि रायफल, प्रायोजक- सोनी); पुजा राणी( मुष्टियुध्द 81 किलो, प्रायोजक- बीएफएल);प्राप्ती सेन(टेबल टेनिस, प्रायोजक- बुक अ स्माईल); पृथा वर्टीकर(टेबल टेनिस, प्रायोजक- दालमीया); रौनक साधवाणी(बुध्दीबळ, प्रायोजक- सानी); रेश्मा माने(कुस्ती 63 किलो, प्रायोजक- केएफएल); सचेत पुन्नानाथ( नेमबाजी 10 मि रायफल, प्रायोजक- सोनी);सचिन सिवाच( मुष्टियुध्द 52 किलो, प्रायोजक- सोनी); साजन भानवाल (कुस्ती 77 किलो, प्रायोजक- बुक अ स्माईल); साक्षी शितोळे( तिरंदाजी, प्रायोजक- सायबेज);सालसा आहेर(टेनिस, प्रायोजक- आयसी);शरण्या गवारे(टेनिस, प्रायोजक- सोनी); सिमरन कौर(कुस्ती 43 किलो, प्रायोजक- प्रविण मसालेवाले);सिमरमजीत कौर( मुष्टियुध्द 64 किलो, प्रायोजक- सोनी); शुभंकर डे(बॅडमिंटन, प्रायोजक- बीएफएल);स्वप्निल कुसळे( नेमबाजी, 50मि 3पी, प्रायोजक- रावेतकर); तन्मय मालुसरे( तिरंदाजी, प्रायोजक- सोनी); विक्रम कुराडे(कुस्ती 59 किलो, प्रायोजक- नांदेड सिटी);यश आराध्या(गो कार्टिंग(एफ4), प्रायोजक- बीएफएल);
पुरस्कार विजेत्या खेळाडूंची आदी (2018-19)
पिपल चॉईस(पुरूष)- रौनक साधवाणी(बुध्दिबळ)
पिपल चॉईस (महिला)- साक्षी शितोळे(तिरंदाजी)
सर्वोत्कृष्ट नवोदीत खेळाडू(पुरूष)- अक्षय कुमार(मुष्टियुध्द)
सर्वोत्कृष्ट नवोदीत खेळाडू(महिला)- निशा मलिक(कुस्ती)
ब्रेकथ्रु कामगिरी- पुजा राणी(मुष्टियुध्द)
लक्ष्य ऍथलीट् ऑफ द इयर- सिमरनजीत कौर(मुष्टियुध्द)
यंग अचिवर पुरस्कार- सिमरन कौर(कुस्ती)
सर्वोत्कृष्ट ऍथलीट्(पुरूष)- सचिन सिवाच(मुष्टियुध्द)
सर्वोत्कृष्ट ऍथलीट् (महिला)- निरज फोगट (मुष्टियुध्द)
लक्ष्य इलाईट परफॉर्मर- नमन तन्वर (मुष्ठीयुध्द), विदित गुजराथी(बुध्दिबळ)
लक्ष्य रायझिंग स्टार (महिला)- शरण्या गवारे(टेनिस)
लक्ष्य रायझिंग स्टार (पुरूष) – यश आराध्य(गो-कार्टिंग)
लक्ष्य यंग स्टार(पुरूष)- आदित्य मित्तल(बुध्दिबळ)
लक्ष्य यंग स्टार(महिला) – पृथा वर्टीकर(टेबल टेनिस)