इंडोनेशियातील जकार्ता येथे पार पडलेल्या बॅडमिंटन एशिया ज्यूनियर चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताच्या लक्ष्य सेनने पुरुष एकेरी गटात सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे.
त्याने रविवारी (22 जुलै) अंतिम सामन्यात इंडोनेशियाच्या अव्वल मानांकित कुनलवुत वितीदसरनला 21-19, 21-18 अशा फरकाने सरळ सेटमध्ये पराभूत केले.
46 मिनिटे चाललेल्या या अंतिम सामन्यात दोन्ही प्रतिस्पर्ध्यांनी एकमेकांना तगडी लढत दिली होती. लक्ष्यने सुरुवात सावध केली. तर कुनलवुतने आक्रमक सुरुवात केली होती. मात्र पहिला सेटमध्ये लक्ष्यने 7-7 अशी बरोबरी साधली.
त्यानंतर या दोघांनीही हार न मानता पहिल्या सेटमध्ये 19-19 असा बरोबरी केली होती, परंतू त्यांनंतर लक्ष्यने आघाडी घेत हा सेट 21-19 असा जिंकला.
पहिल्या सेटप्रमाणेच दुसऱ्या सेटमध्ये लक्ष्य आणि कुनलवुतमध्ये कडवी लढत झाली. हा सेटही 17-17 असा बरोबरीचा सुरु होता. पण अखेरच्या क्षणी लक्ष्यने त्याचा खेळ उंचावत हा सेट 21-18 अशा फरकाने जिंकून सुवर्णपदकावर नाव कोरले.
16 वर्षीय लक्ष्यने दोन वर्षांपूर्वी याच स्पर्धेत कांस्य पदकाची कमाई केली होती. तसेच तो या स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणारा केवळ तिसराच भारतीय ठरला आहे.
याआधी 1965 मध्ये गौतम ठक्कर तर 2012 मध्ये पीव्ही सिंधूने सुवर्णपदक मिळवले आहे. त्यामुळे सहावर्षांनंतर लक्ष्यने या स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवून दिले आहे.
तसेच या स्पर्धेत लक्ष्य पुरुष एकेरीत सुवर्णपदक जिंकणारा खट्टरनंतरचा दुसराच खेळाडू आहे.
त्याचबरोबर या स्पर्धेत याआधी 2009 मध्ये प्रणव चोप्रा-प्राजक्ता सावंतला कांस्यपदक, 2011 मध्ये समीर वर्माला रौप्यपदक तर सिंधूला कांस्यपदक मिळाले होते.
India's new Golden Boy!@lakshya_sen enter record books,ending a wait of 53 years to win a gold in the men’s singles event at the Asian Junior Championship with a flawless performance; beats World No1 K.Vitidsarn 21-19,21-18 to secure his biggest ever career medal #IndiaontheRise pic.twitter.com/xwRxMT6wP1
— BAI Media (@BAI_Media) July 22, 2018
A proud moment for India and @lakshya_sen as the tricolor🇮🇳soars high in Jakarta after the World No 9 secured a top of the podium finish, winning the first gold in 6 years at the Asian Junior Championship. #NationalAnthem #IndiaontheRise pic.twitter.com/ak7TWnlxdz
— BAI Media (@BAI_Media) July 22, 2018
महत्त्वाच्या बातम्या:
–चाहत्यांमुळे फुटबॉलच्या चालू सामन्यात स्टेडियममध्ये लागली आग!
–पाकिस्तानच्या या फलंदाजाने एकाच सामन्यात केले ३ विश्वविक्रम
–रोनाल्डिन्होने एकाच सामन्यात केले होते तब्बल 23 गोल