---Advertisement---

ललित मोदींचे ९ वर्षांपूर्वीचे ट्वीट होतेय व्हायरल, सुष्मिता सेनला सर्वांपुढे बोलले होते असे काही

On: शुक्रवार, जुलै 15, 2022 8:40 PM
Lalit-Modi-Sushmita-Sen
---Advertisement---

आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी यांनी गुरुवारी (१४ जुलै) आपल्या एका ट्विटने चर्चेला उधाण आणले आहे. ते मिस युनिव्हर्स सुष्मिता सेनला डेट करत असल्याची अधिकृत घोषणा करताना त्यांनी काही फोटो शेअर केले आहेत. याआधी पोस्ट केलेल्या काही फोटोंनंतर दोघांनी लग्न केल्याची चर्चा होती, पण ललित मोदींनी नंतर आणखी एक ट्विट शेअर करून आपण अजूनही डेट करत असल्याचे स्पष्ट केले.

जेव्हा जेव्हा एखादे मोठे नाव अशा चर्चेत येते, तेव्हा चाहत्यांनी त्यांच्या जुन्या पोस्टही चाहते मोठ्या उत्सुकतेने पाहतात. अशात ललित मोदींचे ९ वर्षांपूर्वीचे एक ट्विट व्हायरल झाले आहे, ज्यानंतर चाहते त्यांची मजा घेत आहेत.

९ वर्षांपूर्वी या ट्विटमध्ये ललित मोदींनी सुष्मिता सेनला ट्विटरवर टॅग केले आहे आणि त्यांच्या एसएमएसला उत्तर देण्यास सांगत आहेत. २७ एप्रिल २०१३ रोजी त्यांनी हे ट्विट केले होते. या ट्वीटवर चाहते आता प्रतिक्रिया देत आहेत. काहींनी तर ललित मोदी आणि सुष्मिता सेन यांच्या प्रेमकहाणीची सुरुवात इथेच झाली असल्याचेही म्हटले आहे.

दरम्यान सुष्मिता सेनबद्दलचे नाते जगजाहीर करताना सर्वप्रथम ललित मोदींनी काही फोटो शेअर केले होते, ज्यात ते सुष्मिता सेनसोबत दिसत आहेत. फोटोंसोबत ललित मोदींनी कॅप्शनमध्ये लिहिले होते की, ‘कुटुंबासह मालदीव आणि सार्डिनियाच्या जागतिक दौर्‍यावरून नुकताच परतलो आहे, आणि माझी बेटर हाफ सुष्मिता सेन. शेवटी आयुष्याची नवी सुरुवात. चंद्रावर असल्यासारखे वाटते आहे.’ ललित मोदींनी त्यांच्या कॅप्शनमध्ये खूप हृदयाचे इमोजीदेखील वापरले होते.

ललित मोदींपूर्वी सुष्मिता सेन रोहमॉन शॉलसोबत डेटिंग करत होती. १५ वर्षांनी तरुण रोहमॉनसोबत तिचं रिलेशनशीप काही दिवसांपूर्वी संपुष्टात आले. त्यानंतर सुष्मिताने चक्क ललित मोदीसोबत संसार थाटल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दुसरीकडे ललित मोदीचेंही लग्न झाले असून त्यांच्या पहिल्या पत्नीचे नाव मीनल होते. १७ ऑक्टोबर १९९१ ला त्यांनी लग्न केले होते. मीनल ललित मोदींपेक्षा ९ वर्षांनी मोठ्या होत्या. त्यांना करीमा नावाची मुलगीही आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

फक्त १७ वनडे सामन्यांचा अनुभव, तरीही इंग्लंडच्या पठ्ठ्याने भारताच्या ६ खेळाडूंना भरले ‘टोपली’त, वाचा सविस्तर

नाचा रे! लेकींसोबत पुन्हा थिरकला वॉर्नर, वरुण धवनच्या ‘नाच पंजाबन’ गाण्यावरील डान्स व्हिडिओ व्हायरल

‘आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३-४ सामने खेळलेल्या हुड्डाची कोहलीसोबत बरोबरी योग्य नाही’, भारतीय दिग्गज भडकला

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---